स्वतःच्या झोपेचं LIVE स्ट्रीमिंग करून पैसे कमवणारे इन्फ्लुएन्सर्स

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टॉम गर्कन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आपल्यापैकी बहुतेकांची झोप कमी असते. मात्र, काहींनी त्यातून पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे.
यू ट्यूब, टिक टॉक आणि ट्वीच सारख्या व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर "स्लीप स्ट्रीमर्स" नावाचे अनेक व्हीडिओ दिसतात. त्यापैकी काही लोक झोपलेल्यांचे लाइव्ह फुटेज टाकतात म्हणजेच लाइव्ह स्ट्रीम करतात.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या दंगलींमागे हात असलेल्या काई सेनेट नावाच्या व्यक्तीने ही कल्पना मांडली होती.
असा एक अंदाज आहे की, मार्चमध्ये त्याने एक महिना न थांबता झोपेचं लाइव्ह स्ट्रीमिंग करून जवळपास 8 लाख रुपये कमावले.
अमरांथ या जगप्रसिद्ध स्ट्रीमरने या विषयाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी उघड केल्या आहेत.
जूनमध्ये एका पॉडकास्ट मध्ये बोलताना, त्याने स्लीप स्ट्रीमिंग करून सुमारे 12 लाख रुपये कमावल्याचं सांगितलं होतं.
असे व्हीडिओ पाहून प्रेक्षकांना हे लोक झोपेत काय करतात याची कल्पना करण्याची संधी मिळतेच शिवाय ते मनोरंजनाचा भाग म्हणूनही हा प्रकार बघत असतात.
हा ट्रेंड कधीपासून सुरू झाला?
झोपेचं लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची कल्पना थोडी विचित्र वाटत असली तरी ती पूर्णपणे नवीन नाहीये.
2000 साली 'बिग ब्रदर' हा पहिला रिअॅलिटी शो सुरू झाला. त्यावेळी जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून बिग ब्रदरची ओळख निर्माण झाली.
24 तास चालणाऱ्या या शोमध्ये घरातील माणसं रात्री कशी झोपतात हे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. अगदी झोपेचं लाइव्ह स्ट्रीमिंगही हिट झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2004 मध्ये नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीने फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या झोपेचं एक तास लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं.
यात नवंनवे प्रयोगही सुरू झाले आहेत. स्ट्रीमर्सना झोपण्यासाठी पैसे देण्याऐवजी, दर्शकांनी त्यांना जागं ठेवण्यासाठी पैसे देण्यास सुरुवात केली.
काही न झोपण्यासाठी पैसे मोजतात तर काही लोक मोठ्याने आवाज करणे, इशारे पाठवणे, दिवे सुरू ठेवणे आणि स्ट्रीमरला झोप येऊ नये म्हणून विविध व्यत्यय आणणे यासारख्या गोष्टी करतात.
यासारखे व्हीडिओ थेट-अॅक्शन व्हीडिओ गेमसारखे असतात. स्ट्रीमर्स त्यात झोपण्याचा प्रयत्न करतात. खेळाडूंसारखे प्रेक्षक त्यांना जागे करण्यासाठी वाटेल ते करतात.
हा ट्रेंड सर्वप्रथम टिक टॉक वर सुरु झाला. त्यात जॅकी बोहम आणि स्टॅनले मोव्ह सारख्या स्लीप इन्फ्लुएंसर्सचा समावेश होता. स्टॅनले मोव्हने एकेठिकाणी सांगितलं होतं की, तो झोपेचं स्ट्रीमिंग करून घराचं भाडं देता येईल एवढे पैसे कमवतो.
झोपलेल्या स्ट्रीमरला त्रास देण्याच्या विशेषाधिकारासाठी दर्शकांना खूप पैसे मोजावे लागतात. उदाहरणार्थ, स्टॅनले मोव्हला झोपेतून जागं करण्यासाठी दर्शकांना 95 डॉलर (सुमारे 7800 रुपये) मोजावे लागतात.
हे स्ट्रीमर्स तुम्हाला जागं ठेवण्यासाठी अलर्ट पाठवण्यासारखे पर्याय वापरतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्टॅनले मोव्हने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "जेव्हा मी झोपेचं स्ट्रिमिंग करत असतो तेव्हा मी त्याचा यूट्यूब कंटेंट म्हणून वापर करतो. झोपेतून स्वतःला जागं ठेवण्यासाठी मी स्वतःला इलेक्ट्रिक शॉक देतो. माझ्यासाठी ओरडणं म्हणजे पैसे कमावणं आहे."
तो पुढे सांगतो, "काही लोकांना इतरांना झालेला त्रास पाहून त्यांच्या वेदना पाहून आनंद होतो."
झोपेपासून बचाव करण्याच्या विविध प्रयत्नांसाठी खूप सारे शुल्क आकारणाऱ्या स्टॅनलेने या प्रकारच्या स्ट्रीमिंग मधून सध्या ब्रेक घेतलाय. तो सांगतो, "मला मानसिक त्रास सुरू झाल्याने मी हे काही वर्षांसाठी थांबवलं आहे."
स्टॅनले सांगतो, "गेल्या तीन वर्षांपासून मी हे काम करत होतो. मी आठवड्यातून 3 व्हीडिओ तयार करतो. माझ्या कंटेंटचा विचार केला तर तो स्वतः तयार करून एडिट करावा लागतो. यामुळे माझ्यावर प्रचंड मानसिक ताण असतो. मी विनोदी प्रकारातील व्हीडिओ तयार करतो."
ते चांगले आहे का?

फोटो स्रोत, Stanleymov
आता या स्ट्रीमिंगमधून पैसे कमावता येतात तर खरे, पण हे आरोग्यासाठी चांगलं आहे का?
नेव्हिगेटिंग स्लीपलेसनेस या सेल्फ-हेल्प पुस्तकाच्या लेखिका आणि झोपेच्या तज्ज्ञ डॉ. लिंडसे ब्राउनिंग सांगतात की, या संदर्भात दोन विचारसरणी आहेत.
डॉ. लिंडसे सांगतात, रात्रीची पुरेशी झोप शरीरासाठी आवश्यक आहे, असं विज्ञान सांगतं. आणि याचे अनेक फायदेही आहेत
पण प्रत्येकाला आयुष्यात सगळ्याच संधी मिळतात असं नाही. जर मुलाला बरं नसेल तर पालकांना रात्रभर जागं राहावं लागतं. आपण योग्य झोप घेऊ शकत नाही याची आपल्याकडे शंभर कारणं असू शकतात असं त्या म्हणतात
त्या सांगतात, "मी निद्रानाशाच्या रुग्णांसाठी काम करते. अनेकांना झोपायची इच्छा असते, पण त्यांचा मेंदू त्यांना झोपू देत नाही. निद्रानाश बरा करण्याची गुरुकिल्ली म्हणजे झोप लागण्याच्या भीतीपासून मुक्त होणं."
झोपेचं स्ट्रीमिंग करणं चांगलं नाही. ज्या कामातून मूठभर पैसे मिळतात ते काम दर दोन किंवा तीन आठवड्यांनी करणं चुकीचं आहे असं ही लिंडसे म्हणतात.
पण स्वतःला विजेचे झटके देणाऱ्या स्ट्रीमर्सचा असा विश्वास आहे की अमरांथ आणि काई सेनेट पाहिल्याने लोकांना रात्रीची चांगली झोप येते.
यावर स्टॅनले म्हणतो, लोक स्वतःच्या आनंदासाठी हे पाहतात. अनेकांना वाटतं की आपण एकटे नाही आहोत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








