धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचं उत्तर, 'आधी माझे फोटो काढा, बघूया काय बिघडवता'
धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचं उत्तर, 'आधी माझे फोटो काढा, बघूया काय बिघडवता'
कोल्हापुरात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.
धनंजय महाडिक म्हणाले होते की, "काँग्रेसच्या सभेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो."
या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीकेनंतर त्यांनी माफीही मागितली.
महाडिकांना उत्तर देताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "आमच्या महिलांचे फोटो काढण्याआधी माझे फोटो काढा, आम्ही पाहतो तुम्ही काय बिघडवता ते."
धनंजय महाडिक काय म्हणाले आणि त्यावर सतेज पाटील, प्रणिती शिंदेंनी काय उत्तर दिलं, हे सविस्तर या व्हीडिओतून जाणून घ्या.






