मी एखाद्या फुग्यासारखा फुगलो होतो, किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णाची व्यथा

फोटो स्रोत, PIOTR POKRZYWNICKI
पिटोर पोख यांचे पाय सुजले पण ते काम करत राहिले. घर बांधायचं एक काम त्या बांधकाम कामगाराला पूर्ण करायचं होतं. तीन दिवसांनंतर त्यांना खूपच थकवा जाणवू लागला आणि त्यांना रुग्णालयात न्यावं लागलं.
दोन आठवडे अनेक चाचण्या आणि क्ष किरण तपासण्या झाल्या. त्यांना नेमकं काय झालं आहे, हे डॉक्टरांनाही समजेना.
रक्त दाट करणाऱ्या इंजेक्शन्ससाठी तीन आठवड्यांनी एकदा डॉक्टरला भेटण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. उच्च रक्तदाबासाठी त्यांना गोळ्याही देण्यात आल्या होत्या. पण त्यांचे पाय सुजून मोठे होत गेले.
पीटोर एडिनबर्गला राहतात. 6 फूट 5 इंच एवढी त्यांची उंची आहे. ते अतिशय फिट व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. ते धावपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
"माझे पाय एवढे मोठे झाले की मला कोणतीही विजार घालता येईना. पायांचं वजन 30 किलो झालं.
त्यानंतर मला रुग्णालयातून कॉल आला. तातडीने भरती व्हा असं त्यांनी सांगितलं".

फोटो स्रोत, PIOTR POKRZYWNICKI
"मी जेव्हा तिथे होतो तेव्हा डॉक्टर त्यांच्या विद्यार्थ्यांना माझ्या पायाचं परीक्षण करायला सांगितलं. माझ्या शरीरात काहीतरी विचित्र घडतं आहे. याचा नीट अभ्यास करा असं डॉक्टर त्या मुलांना सांगत होते", असं 47वर्षीय पीटोर यांनी सांगितलं.
दोन महिन्यात त्यांचं संपूर्ण शरीर सुजलं. त्यांच्या किडन्यांमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं.
सहा महिने डॉक्टर त्यांच्या शरीरावर विविध चाचण्या करुन पाहात होते.
त्यांनी मला प्रायोगिक स्वरुपात औषधं दिली. त्याचे भयंकर असे दुष्परिणाम होते. त्यामुळे माझ्या किडनीचा आकार सातत्याने लहानमोठा होत असे. रक्त माझ्या किडनीत शिरलं होतं. किडन्यांनी काम करायचं थांबवलं.
मी एखाद्या फुग्याप्रमाणे फुगलो होतो. अतिशय भीतीदायक वाटायचं. मला आत्महत्या करावीशी वाटे. माझी तब्येत अगदीच भयंकर झाली होती.
अख्खं शरीर सुजलं होतं आणि मी खाली बसूही शकत नसे.
मला सतत तहान लागायची, पण माझ्या शरीरातून लघवीचं उत्सर्जन होत नव्हतं.

फोटो स्रोत, PIOTR POKRZYWNICKI
औषधांमुळे अपस्माराचा त्रासदेखील झाला. शरीर इतकं सुजलं होतं की मला जराही हालचाल करता येईना.
डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातून 12 किलोचे दोन खडे द्रवस्वरुपात बाहेर काढले. त्यांची तब्येत नीट होण्यासाठी वर्ष लागलं.
जुलै 2017 पासून पीटोर यांना काम करता येत नाहीये कारण त्यांचे पाय तेव्हापासून सुजत आहेत.
माझ्यासाठी अतिशय अवघड असा हा कालखंड होता. दरदिवशी मला ब्रह्रांड आठवत असे असं त्यांनी सांगितलं.
दर आठवड्याला मी शेकडो गोळ्या घेत असे. मला कमी पाणी प्यावं लागत असे. माझं आयुष्यच बदलून गेलं. मी काम करु शकत नसे, पण मला काम करायचं असे.
2010 मध्ये पीटोर पोलंडहून स्कॉटलंडला रवाना झाले. आठवड्यातून तीनवेळा त्यांना डायलिसीसची ट्रिटमेंट घ्यावी लागते. किडनी दात्यासाठी ते प्रतीक्षा यादीत आहेत.
तीनवेळा मला त्या यादीतून बाहेर काढण्यात आलं. सध्या तर मला त्या यादीतून हद्दपार करण्यात आलं आहे कारण माझ्या शरीरातून आणखी द्रव बाहेर पडायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं.
आणखी अडीच किलो वजन कमी करण्यास सांगितलं आहे. मला कमी पाणी प्यायला सांगितलं आहे. औषधं काम करतील अशी आशा आहे.
मी 10,000 लिटर पाणी पिऊ शकतो पण मला लघवीला होत नाही. चार वर्षात मला धड लघवीला झालं नाहीये. नव्या किडनीसाठी मी आतूर आहे.
अनेकविध गुंतागुंत
पिटोर यांची काळजी म्हणून देण्यात आलेल्या औषधांनी त्यांची प्रकृती सुधारलेली नाही किंवा ढासळलेलीही नाही असं डॉ. ट्रेस जाइल्स यांनी सांगितलं. ते एनएचएस लोथिअन इथे वैद्यकीय संचालक आहेत.
किडनीचा आजार वेगाने फोफावतो असं त्यांनी सांगितलं.
किडनीच्या आजारामुळे शरीरात गुंतागुंत निर्माण होते. शरीर सुजतं, रक्तात गुठळ्या निर्माण होतात असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
वॉरफरीन हे औषध रक्तात गुठळ्या निर्माण होऊ नयेत यासाठी दिलं जातं.
पिटोर यांच्यासाठी हा काळ अतिशय कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यांना जे जे होतंय त्याबाबत आमच्या टीमच्या संपर्कात राहून सांगावं असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








