'ऑरा फार्मिंग'चं रील व्हायरल झालं अन् लाखभर प्रेक्षक बोट शर्यतीला आले
नुकतंच सोशल मीडियावर बोटीवर सर्वात समोर उभा असलेला एक मुलगा डान्स करत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर हा व्हीडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या व्हीडिओतील मुख्य आकर्षण म्हणजे रायन अर्खन दिखा हा 11 वर्षीय मुलगा. त्याच्या बोटीवरील युनिक डान्सचे रील इतके व्हायरल की तो जगभरात फेमस झाला.
'ऑरा फार्मिंग बोट रेसिंग किड' म्हणून तो जगभरात धुमाकूळ घालतोय. त्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर 'ऑरा फार्मिंग' नावाचा ट्रेंड सुरु झालाय. तर आता, रायनसारख्याच इतर मुलांना पाहायला इंडोनेशियाच्या या बोटरेसमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांवर कुआंतन सिंगिंगीमध्ये यंदा पाकू जलुर महोत्सव पार पडला तेव्हा या महोत्सवाला तब्बल 1 लाख लोकांनी हजेरी लावल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






