तेलंगणातील केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची संख्या 27 वर
तेलंगणातील केमिकल फॅक्टरी स्फोटातील मृतांची संख्या 27 वर
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पशमैलाराम औद्योगिक वसाहतीतल्या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आग लागली.
सिगाची केमिकल्स उद्योगात ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं तेलंगणाचे आरोग्यमंत्री दामोदर राजनरसिंहा यांनी सांगितलं होतं. जखमींपैकी आणखी काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 27 वर गेली आहे.
दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्फोटामुळे लागलेली मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






