तीन मोठ्या शहरांना पाणी पुरवणाऱ्या उजनी धरणाच्या पायथ्याजवळील गावं मात्र तहानलेली

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र पाणी टंचाई: उजनी धरणाच्या पायथ्याजवळची गावंच तहानलेली
तीन मोठ्या शहरांना पाणी पुरवणाऱ्या उजनी धरणाच्या पायथ्याजवळील गावं मात्र तहानलेली

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे. या धरणावर पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पाणी पुरवठा आणि सिंचन अवलंबून आहे.

गेली काही दशकं उजनी धरण त्याच्या कुशीतल्या जिल्ह्यांची तहान भागवतंय. शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांना आधार देतंय.

मात्र, याच उजनीच्या परिसरातल्या गावांवर आता दुष्काळाचं सावट घोंगावतंय.

पाहा बीबीसी मराठीचा खास ग्राऊंड रिपोर्ट.

  • रिपोर्ट - गणेश पोळ
  • एडिट - अरविंद पारेकर