फ्युएल कंट्रोल स्विच नेमके कसे काम करते? त्याचा वापर कधी केला जातो?

व्हीडिओ कॅप्शन, विमानातला फ्यूएल स्विच काय असतो?
फ्युएल कंट्रोल स्विच नेमके कसे काम करते? त्याचा वापर कधी केला जातो?

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामागचं प्राथमिक कारण स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, दोन्ही फ्यूएल कंट्रोल स्विच बंद झाल्यामुळे इंजिनचा इंधनपुरवठा थांबला आणि त्यामुळे अपघात घडला.

हे दोन्ही फ्यूएल स्विचेस विमानाच्या सेंटर कन्सोलमध्ये असतात. त्यांचं मुख्य काम म्हणजे विमान जमिनीवर असताना किंवा लँडिंगच्या वेळी इंजिन बंद/चालू ठेवण्याचं असतं.

हे स्विच आकाशात असताना वापरण्याची गरज सहसा भासत नाही, आणि केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, जसं की इंजिन फेल होणं किंवा आगीची घटना अशा वेळेसच वापरले जातात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)