‘विद्यार्थी रिकामे डबे घेऊन शाळेत येतात’
‘विद्यार्थी रिकामे डबे घेऊन शाळेत येतात’
श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा लहान मुलांना सर्वाधिक फटका बसला आहे, असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे. देशातील 60 लाखांपेक्षा जास्त लोकांची खाण्यापिण्याची भ्रांत आहे.
अनेक कुटुंबांवर आपल्या मुलांचं शिक्षण बंद करावं लागण्याची वेळ ओढवली आहे. काही कुटुंबांसमोर एक अत्यंत अवघड प्रश्न उभा आहे - आहेत त्या पैशातून आपल्या कोणत्या अपत्याला शाळेत पाठवायचं?






