उत्तर प्रदेशमधील या गावांमध्ये लांडग्यांची दहशत, चिमुकल्यांवर होत आहेत जीवघेणे हल्ले

व्हीडिओ कॅप्शन, उत्तर प्रदेशमधील या गावांमध्ये लांडग्यांची दहशत, चिमुकल्यांवर होत आहेत जीवघेणे हल्ले
उत्तर प्रदेशमधील या गावांमध्ये लांडग्यांची दहशत, चिमुकल्यांवर होत आहेत जीवघेणे हल्ले

लांडग्याच्या दहशतीमुळे उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील लोक घाबरले आहेत. हा भाग भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या तराई आंचलचा आहे, जिथं लांडग्यांची एक मोठी टोळी विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करत आहे.

लांडग्यांच्या हल्ल्यापासून वृद्धही वाचलेले नाहीत. या भागात जुलैपासून लांडग्यांनी सहा मुलांना लक्ष्य केलंय आणि 26 जण जखमी झाले आहेत.

लांडग्यांचा हा कळप पकडण्यासाठी वनविभाग रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, मात्र आतापर्यंत केवळ तीनच लांडगे पकडण्यात त्यांना यश आलं आहे.

व्हीडिओ: सैय्यद मोजिज इमाम आणि तारिक खान

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)