लग्नसोहळ्यात गोळीबार, वधूचा मृत्यू आणि एक मुलगा जखमी; नेमकं काय घडलं?
लग्नसोहळ्यात गोळीबार, वधूचा मृत्यू आणि एक मुलगा जखमी; नेमकं काय घडलं?
फ्रान्समध्ये एका लग्नसमारंभात काही मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला यात नववधूचा तिच्या लग्नाच्या रात्री मृत्यू झाला. दक्षिण-पूर्व फ्रान्समधील ॲव्हिनयॉन शहराजवळच्या गौल्ट गावात ही घटना घडली.
एएफपी वृत्तसंस्थेनुसार, रविवारी 22 जूनच्या पहाटे 4:30 वाजता वधूवर लग्नसमारंभानंतर हॉलमधून बाहेर पडताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
यावेळी एका संशयित हल्लेखोराचाही गोळीबारात मृत्यू झाला, तर 13 वर्षांचं एक मूल गंभीर जखमी झालं. हल्ल्याच्या वेळी एकूण 28 लोक हॉलमध्ये उपस्थित होते, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेत एक महिलाही किरकोळ जखमी झाली.






