पहिलीपासून हिंदी शिकवावी का? भाषातज्ज्ञ गणेश देवींना काय वाटतं?

व्हीडिओ कॅप्शन, पहिलीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याबद्दल भाषा आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. देवी यांचं मत काय?
पहिलीपासून हिंदी शिकवावी का? भाषातज्ज्ञ गणेश देवींना काय वाटतं?

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, हा निर्णय म्हणजे धूळफेक होती का, असा प्रश्न अनेकजण आता उपस्थित करत आहेत. कारण नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटलंय की, 'हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल'.

पण यावरून राज्यात खूप मोठा वादंग सुरू आहे. पहिलीपासून तिसऱ्या भाषेची गरज काय? तिसरी भाषा हिंदीच का? यामागे काही राजकारण आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यासर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर मयुरेश कोण्णूर यांनी भाषा आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्याशी संवाद साधला.