प्रेमसंबंध आणि जोडीदाराचा शोध घेण्याचा हिवाळा हा सर्वांत चांगला मोसम आहे का?

संकल्पनात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक छायाचित्र
    • Author, मॉली गॉर्मन

जेव्हा हिवाळा सुरू होतो तेव्हा अविवाहित, सिंगल लोकांना चाहूल लागते ती जोडीदाराची. जोडीदाराच्या शोधात एकाच वेळी अनेक जण असणे याला 'कफिंग सीझन' असं म्हटलं जातं. या पाठीमागे सांस्कृतिक संदर्भ देखील आहेत.

मात्र यामागे एखादं विज्ञान आहे का? याबाबत या लेखातून जाणून घेऊया.

याच थंडीच्या मोसमात लोक जोडीदार शोधतात.

हे मी आधीच स्पष्ट करते की मी यातून वाईट वर्तनाला प्रोत्साहन देत नाहीये. तर 'कफिंग सीझन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सांस्कृतिक संकल्पनेचा संदर्भ देते आहे.

'कफिंग सीझन' म्हणजे जेव्हा अविवाहित लोक उन्हाळ्यातील एकटेपणाला आणि शुष्कपणाला निरोप देतात आणि हिवाळ्याच्या थंडीत रोमँटिक नातं शोधतात.

मला माहीत आहे की लोकांना ते का आवडतं किंवा किमान ते सोयीचं का आहे? एखादा जोडीदार असल्यास किंवा चांगली सोबत असल्यास चांगले क्षण अधिक मधुर होतात आणि तणावग्रस्त क्षण हलके होतात.

प्रेमी जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

'कफिंग सीझन' म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही सुट्टीत नातेवाईकांसोबत आहात आणि अचानक खाता-पिताना अविवाहित लोकांना विचारलं जातं. मग आता दोनाचे चार हात कधी करणार? अनेक ठिकाणी लग्नासाठीच नाही तर कुणासोबत डेट तरी करत आहात की नाही याबद्दल विचारलं जातं.

त्यावेळी त्या व्यक्तीसाठी काही काळापुरतं ते अवघडल्यासारखं होतं परंतु ती व्यक्ती यावर विचार देखील करू लागते. नंतर त्यातून त्या व्यक्तीचा जोडीदाराचा शोध सुरू होतो त्याच सीझनला 'कफिंग सीझन' म्हटलं जातं.

'कफिंग सीझन' हा शब्द नेमका कुठून आला हे नेमकं स्पष्ट नाही. असं मानलं जातं की हा शब्द 2009 च्या सुमारास उदयाला आला. तेव्हा, एखादं नातं गांभीर्यानं सुरू करण्यास अनौपचारिक भाषेत 'कफिंग करणं' हा शब्द वापरला जात असे.

मात्र हिवाळ्यासाठीच लोक मुद्दामहून जोडीदार शोधतात का? आणि खरंच जर तसं असेल, तर या वर्तनातून आपल्याला मानवी मानसशास्त्राबद्दल किंवा अगदी मानवी उत्क्रांतीबद्दल काही समजू शकतं का? यामागं एखाद विज्ञान आहे की नाही, हे मी तपासलं.

"कफिंग सीझन म्हणजे अशी कल्पना की समागम किंवा मिलन ऋतूमानानुसार असतं," असं क्रिस्तिन मा-केलॅम्स म्हणतात. त्या कॅलिफोर्नियातील सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत.

प्रेमी जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र हे असं वर्तन का होतं, याबाबत एकमत नाही. जर तुम्ही आधुनिक काळातील लोकांच्या वर्तनाकडे पाहिलं तर, मा-कॅलम्स म्हणतात, "पॉर्न आणि डेटिंग वेबसाईट्स, अगदी देहविक्रेय करणाऱ्या व्यक्तींचा शोध या गोष्टींसाठी सर्च होण्याचं प्रमाण वर्षातून दोनदा सर्वाधिक असतं. ते फक्त हिवाळ्यातच नसतं. तर ते उन्हाळ्यातदेखील असतं."

उदाहरणार्थ, यासदंर्भात 2012 चा एक अभ्यास लक्षात घेता येईल. हा अभ्यास इंटरनेटवरील सेक्सशी संबंधित शब्दांच्या प्रमाणावर करण्यात आला होता. त्यातील निष्कर्ष दाखवतात की या गोष्टींसाठी सहा महिन्याचं एक सातत्यपूर्ण चक्र असतं. त्यात हिवाळा आणि उन्हाळ्यात याप्रकारच्या शब्दांचे सर्च सर्वाधिक होतात.

1990 च्या दशकात आणखी एक अभ्यास करण्यात आला होता. त्यात लैंगिक क्रियांमध्ये हंगामानुसार म्हणजे ऋतुमानानुसार बदल होतात का हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी विवाहबाह्य संबंधांमुळे होणारे जन्म, गर्भपात, लैंगिकरीत्या संक्रमित संसर्ग आणि कंडोमची विक्री या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या. त्यांनी या गोष्टींचा एक आराखडा तयार केला.

त्यामधून संशोधकांना आढळलं होतं की ख्रिसमसच्या काळात लैंगिक क्रियांमध्ये (आणि असुरक्षित सेक्समध्ये) वाढ होते. मात्र हाच ट्रेंड सुरू आहे हे दाखवणारे कोणतेही अभ्यास अलीकडच्या काळात झालेले नाहीत.

डेटिंग ॲप्सचा वापर, जोडीदार शोधण्याची वेळ

तरीदेखील, डेटिंग ॲप्सवरील डेटामधून असं दिसतं की शरद ऋतू आणि हिवाळा हा जोडीदार शोधण्याचा सर्वात लोकप्रिय काळ असतो.

'बम्बल' या डेटिंग ॲपवरील संशोधनातून असं दिसून आलं आहे की नवीन जोडीदार मिळवण्याचा सर्वात लोकप्रिय काळ नोव्हेंबरचा शेवट आणि फेब्रुवारीचा मध्य या दरम्यानचा असतो. व्हॅलेंटाईन डे ब्रेकअपसाठी ही योग्य वेळ असते.

जोडीदारांच्या अपेक्षांसाठी हा एक 'अतिशय स्क्रिप्टेड' दिवस असतो. संशोधकांच्या मते हा दिवस, नातेसंबंध वाढवण्याऐवजी ती संपवू शकतो.

डेटिंग अॅप्स

फोटो स्रोत, Getty Images

"आम्हाला माहीत आहे की लोक या रोमान्स आणि सुट्ट्यांच्या कल्पनेबद्दल काही प्रमाणात विचार करत आहेत," असं जस्टिन गार्सिया म्हणतात. ते इंडियाना विद्यापीठातील द किन्से इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आहेत. हे इन्स्टिट्यूट म्हणजे लैंगिकता आणि नातेसंबंध यासाठीचं एक संशोधन केंद्र आहे.

तसंच जस्टिन हे, द इंटिमेट ॲनिमल या पुस्तकाचे लेखक आहेत. जस्टिन गार्सिया हे मॅचडॉट कॉम या डेटिंग वेबसाईटचे मुख्य वैज्ञानिक सल्लागारदेखील आहेत.

जस्टिन गार्सिया म्हणतात, "ऑनलाइन डेटिंग संपूर्ण वर्षभर होत असते. इथे खूप गोष्टी घडत असतात. दररोज लाखो जोडीदार बदलले जातात आणि मेसेज पाठवले जातात. मात्र हिवाळ्याच्या काळात तुम्हाला यात खरोखरंच वाढ झालेली दिसून येते."

अर्थात हे असं का असतं याबद्दल आपण सिद्धांत मांडू शकतो. कदाचित आपण आपल्या घरात अडकलेलो आहोत, जिथे नवीन लोकांशी संपर्क साधण्याचं एकमेव साधन म्हणजे आपला फोन आहे.

कदाचित, डेटिंग हे खरोखरंच हंगामी असतं का किंवा ऋतूमानावर अवलंबून असतं का हे जाणून घेण्यासाठी, प्राणी कसे वागतात त्याहून निरीक्षण करून हे समजून घेऊ शकतो.

काही प्रजाती - सर्व नाही - विशिष्ट हंगामात किंवा ऋतूत प्रजनन करतात. मानवदेखील असंच करण्यासाठी उक्रांत झाला आहे का?

मिलनासंदर्भातील मानवी वर्तन

स्यू कार्टर इंडियाना विद्यापीठातील प्रतिष्ठित वैज्ञानिक आहेत आणि जीवशास्त्राच्या एमेरिटस प्राध्यापक आहेत.

"काही प्रजाती अशा आहेत ज्या विशिष्ट हंगामात किंवा ऋतूमध्येच काटेकोरपणे प्रजनन करतात. उदाहरणार्थ, गाय. कारण त्यांचा गर्भधारणेचा कालावधी मोठा असतो. त्यांची पुढची पिढी जन्माला येते तेव्हा त्यांना ताजं गवत खावं लागतं," असं स्यू कार्टर म्हणतात.

पक्षीदेखील असे प्रजाती असतात, जे ऋतुमानानुसार प्रजनन करतात.

माणसांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. "मानवाचं लैंगिक वर्तन आणि सामाजिक वर्तन संधीसाधूपणाचं असतं. आपण हंगामी स्वरूपात लैंगिक संबंध ठेवणारे प्राणी नाही. जर सेक्स करण्याची संधी असेल, तर अनेकजण ते करतील," असं कार्टर म्हणतात.

वेगवेगळ्या हंगाम किंवा ऋतूमधील जन्मदरातील बदल या गोष्टीला समर्थन देतात. अमेरिकेत सप्टेंबर महिन्यात जन्मदर अधिक असतो, म्हणजे बहुतांश मुलं सप्टेंबरमध्ये जन्माला येतात. याचा अर्थ त्यांची गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असते. मात्र स्थळ आणि वेळेनुसार हा पॅटर्न बदलतो.

प्रेमी जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

"लोक म्हणतात की हे प्रमाण शरद ऋतूत सर्वाधिक असतं कारण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे यात वाढ होते," असं रँडी नेल्सन म्हणतात. ते पश्चिम व्हर्जिनिया विद्यापीठातील न्यूरोलॉजिकल रिसर्चचे विभागप्रमुख आहेत.

मात्र, "कोणीही प्रजननात अशी प्रचंड वाढ पाहिलेली नाही, जी जीवशास्त्राव्यतिरिक्त इतर कारणांनी (सुट्ट्या, हवामान किंवा सामाजिक घटक) स्पष्ट केली जाऊ शकत नाहीत. ते नेहमीच जवळपास सांस्कृतिक किंवा सामाजिक असतं," असं नेल्सन म्हणतात.

ते पुढे म्हणतात की काही स्थानिक कृषी समुदायांमध्ये कापणीनंतर नऊ महिन्यांनी अधिक जन्म झालेले दिसून येतात. ते म्हणतात, "आणि पुन्हा, ती बाब सामाजिक कारणांनीच प्रेरित आहे... कापणीनंतर नऊ महिन्यांनी तुम्हाला जन्मदरात वाढ झालेली दिसून येते."

त्याऐवजी नेल्सन म्हणतात, "(मानवांमध्ये) लोक ज्या ऋतुमानानुसार होणाऱ्या मुख्य पॅटर्नवर लक्ष केंद्रित करतात, ते म्हणजे सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी). ही एक जैविक घटना आहे."

सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर हे वारंवार येणारं 'विंटर ब्लूज' आहे. त्याचा परिणाम समशीतोष्ण प्रदेशातील देशांमध्ये जवळपास 1-3 टक्के प्रौढांवर होतो. महिलांमध्ये ते अधिक दिसून येतं.

हिवाळ्यात जाणवणारं दु:ख आणि एकटेपणा अर्थात 'विंटर ब्लूज'

संशोधनातून असं दिसून येतं की युकेसारख्या हवामानात राहणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अतिशय खराब असतं. कारण या दिवसांमध्ये दिवसाचे तास कमी असतात आणि हवामान थंड असतं. त्यामुळे बाहेर कमी वेळ घालवला जातो.

परिणामी एकाकीपणाची भावना वाढू शकते. आपण जेव्हा कमी प्रमाणात दिवसाचा प्रकाश शोषून घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील सेरोटोनिनची पातळीदेखील घटते.

सेरोटोनिन हा एक महत्त्वाचा न्युरोट्रान्समीटर आहे, जो सर्केडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळ (आपल्या झोपण्याच्या आणि जागं होण्याच्या चक्रांचं नियमन करणारं शरीरातील घड्याळ) तसंच आपलं वर्तन आणि मूड यांचं नियमन करण्यास मदत करतो. सेरोटोनिनची पातळी कमी झाल्यास त्याचा आपल्या जैविक क्रियांवर परिणाम होतो.

"मुळात, आपण शरद ऋतूत आणि हिवाळ्यात गुहांमध्ये राहतो," असं नेल्सन म्हणतात. बहुतांश लोकांना घराबाहेर पडण्याची संधी मिळत नाही. ते अंधारातच उठतात, कृत्रिम प्रकाशात काम करतात आणि घरीदेखील अंधारातच जातात.

लाल फुगे

फोटो स्रोत, Getty Images

"आपल्या सर्व जैविक क्रिया अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी आपल्या शरीराचं घड्याळ 24 तासांशी जुळवून घेतं. यात तुमच्या शरीरातील हार्मोनची पातळी आणि न्युरोट्रान्समीटर्सचाही समावेश असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला चांगल्या प्रकाशात राहणंदेखील आवश्यक असतं. मात्र हिवाळ्यात चांगला सूर्यप्रकाश कधीच दिसत नाही," असं ते म्हणतात.

कदाचित, याबाबतीत आपण बरं वाटण्यासाठी इतर मार्गांनी प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, प्रेमसंबंध किंवा रोमान्सच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातो.

"सर्केडियन रिदमचं (जैविक घड्याळ) नियमन बिघडल्यामुळेदेखील याप्रकारचे नैराश्यासारखे काही विशिष्ट हार्मोन्स किंवा ऑक्सिटोसिनसह काही हार्मोन्सची कमतरता निर्माण होऊ शकते. यात मेंदूमध्ये विशिष्ट डोपामिनर्जिक आणि सेरोटोनर्जिक परस्परसंवादांचा अभाव होऊ शकतो," असं नेल्सन म्हणतात.

ते पुढे म्हणतात, "त्यामुळे मला वाटतं की हिवाळ्यात मला काही डोपामाइनची आवश्यकता आहे, मला काही ऑक्सिटोसिनची आवश्यकता आहे, कदाचित ही व्यक्ती ते देईल, अशी मानसिकता तयार होऊ शकते."

हार्मोन्सचा परिणाम आणि हनिमून इफेक्ट

ऑक्सिटोसिन हे 'लव्ह हार्मोन' म्हणून ओळखलं जातं. मुख्यत: महिलांमधील गर्भधारणा आणि प्रसूती, सामाजिक बंधन आणि तणाव कमी करण्यामध्ये या हार्मोनची भूमिका असल्यामुळे त्याला लव्ह हार्मोन म्हणतात.

आपल्या मेंदूत असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीद्वारे हा हार्मोन आपल्या रक्तप्रवाहात सोडला जातो आणि त्यामुळे आपल्याला सकारात्मक वाटतं.

कार्टर म्हणतात, "आपण माणसं पूर्णपणे सामाजिक प्राणी असतो. समुदाय, संस्कृती निर्माण करण्यासाठी आपण सर्वप्रकारचे प्रयत्न करतो...आणि ते यशस्वी व्हावं यासाठीचं शरीरक्रियाशास्त्र आपल्याकडे आहे. ऑक्सिटोसिन आपल्याला एकत्र आणतं आणि एकत्र राहण्यास मदत करतं."

शारीरिक स्पर्शानं ऑक्सिटोसिनची पातळीदेखील वाढते. उदाहरणार्थ, मिठी मारून आणि सेक्समधून ही पातळी वाढते.

लव्ह हार्मोन

फोटो स्रोत, Getty Images

जोडीदारांमध्ये सेक्समुळे तयार होणारं नातं खूप घट्ट असू शकतं त्याच ठिकाणी 'हनिमून इफेक्ट' तयार होतो. आणि पहिल्या वेळी जो एकमेकांसोबत आलेला रोमँटिक अनुभव हा विशेष असतो जरी त्यावेळी प्रत्यक्ष शारीरिक संबंध नसला तरी.

आपल्या शरीराचे तापमान देखील या गोष्टींना प्रभावित करू शकत असेल. पुरुष आणि महिलांमध्ये थंडीची किंवा उष्णतेची जाणीव कशी होते, यात जैविकदृष्ट्या फरक असतो. सामान्यपणे महिलांची त्वचा आणि स्नायू यामध्ये अधिक चरबी असते.

म्हणून त्यांच्या त्वचेपर्यंत आणि हातपायांपर्यंत (हात, पाय आणि नाकाचं टोक) उष्णता पोहोचू शकत नाही. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांचा चयापचयाचा दर कमी असतो. परिणामी उष्णतेचं उत्पादन कमी वेगानं होतं.

नेल्सन म्हणतात, "त्यामुळेच, तुम्हाला माहीत आहे, हिवाळ्यामध्ये मला माझे हातपाय उबदार ठेवण्यासाठी कुणीतरी सोबत हवं, असं अधिक वाटू शकतं. म्हणजे मला म्हणायचं आहे की, ही एक अंतर्मनात चालणारी विचार प्रक्रिया असू शकते. मात्र ते कदाचित तसंच असेल."

नात्यांबाबत चिंतनाचा काळ

कफिंग सीझन आपल्या खरोखरंच 'नात्यांशी आपण कसं जोडून घेतो' याबद्दल काहीतरी शिकवू शकतो, असं गार्सिया म्हणतात.

विशेषकरून त्या असा युक्तिवाद करतात की रोमान्स किंवा प्रेम शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपलं कुटुंब महत्त्वाची भूमिका बजावतं. आपल्या अवतीभोवती आपलं कुटुंब आणि आपली मित्रमंडळी असतात.

त्यामुळे लोकांकडे विचार करण्यासाठी आणि स्वत:लाच विचारण्यासाठी वेळ असू शकतो. ते असा विचार करू शकतात की सणाच्या या काळात मी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीसोबत घरी येऊ इच्छितो?

पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्रजातीपेक्षा मानवाचे म्हणजे आपलं कुटुंब आणि नातेवाईक आपल्या मिलनात आणि डेटिंगमध्ये जास्त गुंतलेले असतात, असं गार्सिया म्हणतात.

प्रेमी जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

"या संदर्भात स्पष्टपणे नसला, तरीदेखील कुटुंबाचा प्रचंड दबाव असतो. कुटुंब आणि मित्र यांच्याभोवती असणं, आपल्याला या गोष्टीची आठवण करून देत असतं की जोडीदार शोधणं आणि कुटुंब तयार करण्याबद्दल आपल्याकडून अपेक्षा आहेत. हे एका अर्थानं खरोखरंच अद्भूतपणे मानवी आहे," असं ते म्हणतात.

मग, कफिंग सीझनमध्ये काही विज्ञान असतं का? मला याची पूर्णपणे खात्री पटलेली नाही. तज्ज्ञ नमूद करतात त्याप्रमाणे, मानवाची मिलनाची इच्छा आणि वर्तन हे हंगामी किंवा ऋतुमानानुसार नसतात.

त्यामुळे ते वादग्रस्त मानसशास्त्र असूनदेखील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक पॅटर्न त्यात दिसतो. मात्र तुम्हाला त्याबद्दल कदाचित वेगळं वाटेल.

तरुणाई आणि डेटिंगचे ट्रेंड

आजच्या काळातील डेटिंगकडे पाहता, जेन झी आणि विशेषकरून मिलेनियल्स, रोमँटिक नातेसंबंधांबद्दल त्यांना काय वाटतं, त्यांच्या दृष्टीकोनातून याचा काय अर्थ आहे, याचं पुनर्मूल्यांकन करत आहेत.

डेटिंगचे ट्रेंड येतात आणि जातात. उदाहरणार्थ, डेटिंग ॲप्सची कमी होत चाललेली लोकप्रियता.

एकेकाळी तुमच्या स्थानिक भागातील शेकडो नवोदित सिंगल्सना पाहणं हे रोमांचक होतं, तरी 2025 च्या उन्हाळ्यात प्रकाशित झालेल्या फोर्ब्सच्या सर्वेक्षणातून दिसून आलं की अमेरिकेतील डेटिंग ॲपच्या 78 टक्के युजर्सना थकल्यासारखं आणि त्या ॲपचा वापर करताना शिणल्यासारखं वाटत होतं.

तरीदेखील डेटिंग संस्कृतीत आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं दिसतं आहे, असं गार्सिया म्हणतात.

"मला वाटतं की स्वत:ची क्षमता ओळखण्याबद्दल आणि अधिकाधिक चांगलं होण्याबद्दल जास्त लक्ष केंद्रित करणं, हा या समस्येचा एक भाग आहे. मला वाटतं की आज आपल्याला, विशेषकरून तरुणांमध्ये, ही कल्पना दिसते आहे की नातेसंबंध जोडण्याआधी त्यांना स्वत:वर काम करावं लागेल," असं गार्सिया म्हणतात.

लक्षात ठेवा, मानव हा सामाजिक प्राणी आहे. "तुम्ही नातेसंबंधांबद्दल प्रगल्भ होता, तुम्ही चुका करता आणि मग तुम्ही काय आहात आणि नातेसंबंधांमधून तुम्हाला काय हवं आहे, हे तुमच्या लक्षात येतं. नातेसंबंध असं ठिकाण आहे, जिथे तुम्ही हे सर्व शिकता," असं गार्सिया म्हणतात.

अशा परिस्थितीत, कदाचित मी डेटिंग ॲप्सचा वापर करायला हवा किंवा डेटिंगसंदर्भात विचार करायला हवा. मात्र प्रत्यक्षात, मी अशा प्रकारची व्यक्ती आहे, ज्याला नियोजन करून करण्यापेक्षा उत्फूर्तपणे काम करायला आवडतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)