पुण्यातल्या भादलवाडीच्या या शेतकऱ्यानं उभारलं पक्षी अभयारण्य
पुण्यातल्या भादलवाडीच्या या शेतकऱ्यानं उभारलं पक्षी अभयारण्य
पुणे जिल्ह्यातल्या भादलवाडी परिसरात रामकृष्ण येकाळे यांनी आपल्या चार एकर शेतजमिनीवर अनेक वर्षं मेहनत करुन पाच हजारांच्या आसपास झाडं लावली.
आज तिथे अनेक पक्षी अधिवास करुन आहेत. पक्षी निरीक्षणासाठी अनेकजण इथे भेट देतात. पूर्वी ज्या जागेत उसापासून मक्यापर्यंतची पिकं घेतली जायची, तिथं त्यांनी वडा-पिंपळासारखी झाडं उभारत पक्ष्यांना हक्काचा निवारा दिला आहे.
- रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
- शूट- नितीन नगरकर
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर






