बीड, धाराशिवमध्ये पवनचक्क्यांचं अर्थकारण कसं चालतं?

व्हीडिओ कॅप्शन, बीड, धाराशिव मध्ये पवनचक्क्यांचं अर्थकारण कसं चालतं?
बीड, धाराशिवमध्ये पवनचक्क्यांचं अर्थकारण कसं चालतं?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील पवनचक्क्यांचं अर्थकारण चर्चेत आलं.

मराठवाड्यातील बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये फिरताना तुम्हाला जागोजागी पवनचक्क्या उभारल्याचं दिसून येतं.

देशात 2030 पर्यंत पवनऊर्जा, सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पातून 500 गिगावॅट इतकी नूतनक्षम ऊर्जा तयार करण्याचं भारत सरकारचं ध्येय आहे. त्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जातंय.

केंद्राच्या 2024सालच्या आकडेवारीनुसार सध्या महाराष्ट्रात 5.21 गिगावॅट म्हणजेच 5216.38 मेगावॅट पवनउर्जा निर्मिती केली जातेय.

ती क्षमता वाढवण्यासाठी सध्या सरकार तत्पर आहे. या पार्श्वभूमीवर पवनचक्क्यांचं, पवन ऊर्जा प्रकल्पांचं अर्थकारण कसं चालतं? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे

शूट- किरण साकळे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)