महिला नागा साधूंना दीक्षा घेतल्यानंतर काय करता येतं, काय नाही?

व्हीडिओ कॅप्शन, महिला नागा साधूंना दीक्षा घेतल्यानंतर काय करता येतं, काय नाही?
महिला नागा साधूंना दीक्षा घेतल्यानंतर काय करता येतं, काय नाही?

कुंभमेळा म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती नागा साधूंची गर्दी. शाही स्नानासाठी धावणारे असंख्य साधू. अर्थातच 'पुरुष साधू'.

कुंभमेळ्यामध्ये महिला साध्वीही असतात. मात्र, त्यांचं प्रमाण कितपत आहे? कुंभमेळ्याच्या एकूण आयोजनामध्ये त्यांचं स्थान नक्की काय आहे? कुंभमेळ्यामध्ये नागा साधू कसे तयार होतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करत होतोच.

पण त्यासमवेतच महिला साध्वींविषयीही असंख्य प्रश्न माझ्या मनात घोंघावत होते. त्याच प्रश्नांच्या उत्तरांचा घेतलेला हा शोध...

रिपोर्ट - विनायक होगाडे

बीबीसी प्रतिनिधी शूट-

एडीट - संदिप यादव