अल्पवयीनच्या अश्लिल फोटो वादात अडकलेल्या बीबीसीच्या ह्यू एडवर्ड्स यांची कहाणी

ह्यू एडवर्ड्स
फोटो कॅप्शन, ह्यू एडवर्ड्स

एका अल्पवयीनकडून पैसे देऊन अश्लिल फोटो मागवल्याचा आरोप असलेले बीबीसीचे न्यूज प्रेझेंटर ह्यू एडवर्ड्स सध्या चर्चेत आहेत.

एडवर्ड्स हे ब्रिटनमधील सर्वांत हाय-प्रोफाईल टीव्ही प्रेझेंटर्सपैकी एक आहेत. ते लोकप्रिय ब्रॉडकास्टर म्हणूनही ओळखले जातात.

बीबीसीवर बातम्यांचं निवेदन करणाऱ्या लोकप्रिय निवेदकांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. त्यावरूनच बीबीसी त्यांना किती महत्त्व देतं, हे आपल्याला समजू शकतं.

बीबीसीच्या प्रेक्षकांमध्येही ह्यू एडवर्ड्स यांना मानाचं स्थान आहे. बातम्यांची अत्यंत विश्वसनीय आणि शांत मांडणी यातून त्यांनी प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण केला होता.

पण, बुधवारी (12 जुलै) बीबीसी न्यूजमध्ये त्यांचा शेवटचा दिवस होता. हे प्रकरण समोर येण्यापूर्वी ते एडिनबरा येथून वार्तांकन करण्यात व्यग्र होते.

स्कॉटलँडमध्ये किंग चार्ल्स यांच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या तयारीबाबत ते रिपोर्टिंग करत होते.

पण त्याच्या एका आठवड्यातच 61 वर्षीय ह्यू यांचं करिअर धोक्यात आलं.

त्यांच्यावरील आरोपांमुळे या प्रकरणात मोठा गोंधळ माजला होता. त्यांच्या पत्नीनेही याबाबत पुष्टी केली होती.

ट्रेनी म्हणून केली होती सुरुवात

ह्यू एडवर्ड्स यांनी बीबीसीमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक ट्रेनी म्हणून केली होती. 1984 साली त्यांनी बीबीसी संस्थेत प्रवेश केला होता.

त्यानंतर, बीबीसी वेल्समध्ये ते राजकीय प्रतिनिधी बनले.

दोन वर्षांनंतरच बीबीसी वेल्ससाठी ते संसदेतील घडामोडींचं वार्तांकन करू लागले. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ते वेस्टमिंस्टर येथे प्रमुख राजकीय प्रतिनिधी बनले.

ह्यू एडवर्ड्स

त्यानंतर 1997 मध्ये 'बीबीसी न्यूज 24' सुरू झाल्यानंतर ते तिथे नियमित बातम्यांचं निवेदन करणारा चेहरा म्हणून पुढे आले.

पुढील काळात 'बीबीसी न्यूज 24' चंच नाव बीबीसी न्यूज चॅनल असं झालं. सुरुवातीला हे चॅनेल अनेक आव्हानांना तोंड देत होते. त्या स्थितीतही ह्यू यांनी उल्लेखनीय काम केलं. याच कामामुळे त्यांचं बीबीसीत कौतुक होऊ लागलं.

दरम्यान, एडवर्ड्स हे कधी-कधी बीबीसी वनच्या सिक्स ओ क्लॉक न्यूजवर प्रमुख प्रेझेंटर म्हणून येत असत.

ब्रिटनमध्ये सर्वाधिक पाहिलं जाणारं न्यूज बुलेटिन म्हणून हा शो प्रसिद्ध आहे. 1999 मध्ये ते या चॅनेलवरील प्रमुख अँकरमध्ये समाविष्ट झाले.

ह्यू एडवर्ड्स

चार वर्षांनंतर टेन ओ क्लॉक न्यूजवर त्यांना पाठवण्यात आलं. हे बीबीसीचे सर्वाxत महत्त्वाचं अर्थात फ्लॅगशीप बुलेटिन म्हणून ओळखलं जातं.

यानंतर एडवर्ड्स यांना बीबीसीसाठी राष्ट्रीय घटनांवर बुलेटिनचं निवेदन आणि त्यावर टीप्पणी करण्यास सांगितलं जाऊ लागलं.

महत्त्वाच्या घटनांचं कव्हरेज

बीबीसीमध्ये ह्यू एडवर्ड्स यांनी अनेक महत्त्वांच्या घटनांचं कव्हरेज केलं. यामध्ये 2011 सालचा केंब्रिंजचे ड्यूक आणि डचेस यांचा विवाह समारंभ, 2021 सालचा ड्यूक ऑफ एडिनबरा यांचा अंत्यविधी, राणी एलिझाबेथ यांचा डायमंड आणि प्लॅटिनम ज्युबिली (2012 आणि 2022) आणि 2023 सालचा किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक समारोह यांच्यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांचा समावेश आहे.

ह्यू एडवर्ड्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2013 मध्ये त्यांनी नेल्सन मंडेला यांच्या निधनाशी संबंधित एक कार्यक्रमही प्रस्तुत केला होता. 2016 मध्ये ब्रेक्झिट रेफरेंडमचं निवेदनही त्यांनी केलं होतं.

पण एडवर्ड्स यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी दिली.

त्या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या अफवांच्या गदारोळात एडवर्ड्स यांची शिफ्ट सुरू झाली होती. पहाटेपासून या घडामोडींकडे लक्ष ठेवत दुपारी दोन वाजता निधनाची पुष्टी होईपर्यंत त्यांनी काम केलं, अखेर त्याबाबत अधिकृत बातमीही त्यांनीच दिली.

त्यावेळी एडवर्ड्स हे काळा टाय परिधान करून स्क्रिनसमोर आले, तेव्हाच ते ही दुःखद बातमी देणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.

त्यानंतर त्यांनी महाराणींच्या अंत्यविधीचंही वार्तांकन केलं. त्यांच्या या कामाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

या वार्तांकनासाठी त्यांना गेल्या महिन्यात TRIC पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शाही कुटुंबातील घडामोडींचं वार्तांकन करत असतानाच सार्वत्रिक निवडणुकांच्या कव्हरेजचा बीबीसीचा चेहरा म्हणूनही एडवर्ड्स पुढे आले होते.

पगार किती होता?

एड्वर्डस हे बीबीसीतील सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 2017 मध्ये ब्रिटिश पार्लियामेंटनं वरिष्ठ प्रेजेंटर चचा पगार उघड करण्यास सांगितला. एडवर्ड पगार हा 5.50 लक्ष डॉलर असल्याचं उघड करण्यात आलं.

ह्यू एडवर्ड्स

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता आणि बीबीसी आपल्या उत्कृष्ठ प्रतिभेवर किती खर्च करत आहे,या बद्दल मोठा संताप होता. त्याचा पगार आणि इतर पुरुष अँकर तसेच महिला अँकर याच्या पगारात मोठी होती. त्यावेळी एड्वर्डसत्याच्या पगारात कपात स्वीकारली होती.पण कपात करूनही त्याचा पगार हा 4.35 लाख डॉलर होता.

जेम्स बॉण्डच्या चित्रपटात अभिनय

2012 मध्ये आलेल्या जेम्स बॉण्ड च्या चित्रपटात फिल्म स्कायफॉल मध्ये एड्वर्डसची छोटी भूमिका होती. ब्रिटिश इंटेलिजन्स सर्व्हिस M16 वर हल्ला झाल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आलं असून,यात एड्वर्डस बीबीसीवर एक बातमी सादर जातात आहेत.

ह्यू एडवर्ड्स

बीबीसी केमरीला दिलेल्या मुलाखतीत एड्वर्डसने सांगितलं कि "बीबीसीच्या मुख्य न्यूज अँकर म्हणून किती काळ काम करू शकेल हे सांगणे कठीण आहे, कारण ही भूमिका खूप डिमांडिंग असल्याचं ते सांगतात.

त्याचं म्हणणं आहे की मागल्या 20 वर्षांपासून ते 'डिप्रेशन' मध्ये आहेत. बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळं त्यांना अनेकवेळा अंथरुणावर राहावं लागलं.पण त्यांच्या या उत्कृष्ट काळानंतर आता त्याच्या करियरला ग्रहण लागलंय.त्याच्या कामावरचं आता प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय

टॅब्लॉइड 'सन'ची बातमी

टॅब्लॉइड 'सन'ने मागील शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीत एक खळबळजनक खुलासा केलायं की,बीबीसीच्या एका प्रेजेंटरन एका अश्लील छायाचित्रासाठी मोठी रक्कम दिलीयं.तेव्हापासूनच हा प्रेजेंटर कोण असू शकतो याचा अंदाज येऊ लागला होता.

बीबीसी न्यूज

फोटो स्रोत, Getty Images

प्रथम 'द सन' त्यानंतर बीबीसी न्यूज नं या आरोपांबाबत वार्तांकन सुरु ठेवलं.ही बातमी शेवटपर्यंत हेडलाईन मध्ये राहीली.अखेर त्याची पत्नी विकी फ्लिंडनं मान्य केलं की तिचा पती एड्वर्डस यांनाच अश्लील चित्रासाठी पैसे दिले होते.

"तीनं सांगितलं की एडवर्डस गंभीर मानसिक आजारानं त्रस्त आहे.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सध्या तो रुग्णालयात आहे.तोच त्याच्या विषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना उत्तर देऊ शकेल"

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)