दाना चक्रीवादळाचा ओडिसा आणि प. बंगालमध्ये कहर, महाराष्ट्रात काय परिस्थिती?
दाना चक्रीवादळाचा ओडिसा आणि प. बंगालमध्ये कहर, महाराष्ट्रात काय परिस्थिती?
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकलं. भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी इथे ताशी 110 ते 120 किमी वेगानं जोरदार वारे वाहात होते.
त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगालमध्येही मोठं नुकसान झालं आहे.
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. इथे पूरस्थिती पाहता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.






