फॅशन डिझायनर बनण्यासाठी किती खर्च येतो? पुढे पगार किती मिळतो? जाणून घ्या करिअरच्या संधी

फॅशन डिझायनिंग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रियांका झा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

वर्ष 2006, बिहारचा छपरा जिल्हा. इतर लाखो मुलांसारखंच गौरव गोविंद हे देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावण्याची इच्छा बाळगून होते. त्यांना क्रिकेट मनापासून आवडायचं. पण बॅटच्या जागी हातात आली स्केच पेन्सिल.

रॅम्प वॉक करणारे मॉडेल, चमकणारे लाईट्स, सुंदर डिझाईन्सवर टाळ्यांचा कडकडाट, फॅशनच्या जगाशी गौरवची भेट इथूनच झाली.

त्यानंतर गौरवने हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मधून शिक्षण घेतले. नामवंत डिझायनरसोबत काम केले.

स्टार्टअप सुरू केला आणि आता ते NIFT च्या वाराणसी कॅम्पसमध्ये शिकवत आहेत.

त्यांच्याकडे पाहता फॅशन डिझायनिंग हाही करिअरचा एक परिपूर्ण मार्ग ठरू शकतो, यावर विश्वास बसतो.

परंतु, या मार्गापर्यंत पोहोचायचे कसे? आणि या वाटेवर चालणाऱ्यांचे भविष्य कसे असते? 'करिअर कनेक्ट' सिरीजच्या या भागात आज आपण हेच समजून घेऊया.

देशासाठी ही इंडस्ट्री किती महत्त्वाची?

भारतात गौरव गोविंद यांच्यासारखे हजारो लोक सध्या फॅशनमध्ये करिअर करत आहेत.

भारतातलं कापड आणि तयार कपड्यांचा उद्योग (अपॅरल इंडस्ट्री) यातून सुमारे 4.5 कोटी लोकांना रोजगार मिळतो.

याला कृषी क्षेत्रानंतर देशातील दुसरी सर्वात मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री म्हटलं जातं. खास बाब म्हणजे, यामध्ये महिला आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचाही मोठा वाटा आहे.

भारताच्या जीडीपीमध्ये 2.3% आणि देशाच्या एकूण निर्यातीत 12% वाटा याच इंडस्ट्रीचा आहे. भारत, जगातील पाचवी सर्वात मोठी कापड बाजारपेठ आहे आणि सरकारने याला पुढील पाच वर्षात 15-20 टक्क्यांच्या वेगाने वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे.

सरकारी धोरणे, वाढता खप, ई-कॉमर्सचा विस्तार आणि जागतिक मागणी, या सर्व कारणांमुळे फॅशन बिझनेसला नवीन स्वरूप मिळाले आहे.

यामुळेच इंडस्ट्रीला आता असे प्रोफेशनल्स हवे आहेत ज्यांना फक्त डिझाईनच नाही, मॅनेजमेंट, ब्रँडिंग, डेटा आणि स्ट्रॅटेजीची सुद्धा उत्तम समज असेल.

परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या या क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी आवश्यक असतात?

भारतातील कापड उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतातील कापड आणि तयार कपड्यांचा उद्योग जवळपास 4.5 कोटी लोकांना रोजगार देतोय.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यंग मॅन ख्रिश्चन असोसिएशन (YMCA) मध्ये फॅशन डिझायनिंग कोर्स शिकवलेल्या सुनैना द्वारि दास सांगतात की, "फॅशन डिझायनर असे प्रोफेशनल्स असतात जे क्रिएटिव्हिटी, रिसर्च आणि कल्पकतेने कपडे, ॲक्सेसरीज आणि फॅशन प्रॉडक्ट डिझाईन करतात. ते केवळ सुंदर कपडे बनवत नाहीत, तर प्रत्येक डिझाईनद्वारे एक गोष्ट, ओळख आणि विचार मांडतात.

एका फॅशन डिझायनरचे काम कपडे कसे दिसतील? एवढेच नसते, तर त्याआधी ते बदलत्या फॅशन ट्रेंडला समजून घेतात. लोकांची आवड आणि बाजारातील मागणीचा अभ्यास करतात.

कापडाचा प्रकार त्याचे रंग आणि त्याचा पोत यावर नीट अभ्यास करतात. आणि मग आपल्या आयडिया स्केच आणि डिझाईनमध्ये उतरवतात."

"फॅशन डिझायनर हेही ठरवतात की, कोणत्या डिझाईनसाठी कोणते फॅब्रिक (कापड) योग्य असेल, त्याचा पॅटर्न कसा असेल आणि ते किती आरामदायक आणि उपयोगी आहे.

आजच्या काळात फॅशन डिझायनरचा रोल फक्त क्रिएटिव्ह राहिलेला नाही, तर स्ट्रॅटेजिक सुद्धा झाला आहे. त्यांना ट्रेंड ॲनॅलिसिस, ब्रँड आयडेंटिटी, ग्राहकांचे वर्तन आणि उत्पादन आणि त्याचे मार्केटिंग करण्याची समज सुद्धा ठेवावी लागते."

गौरव गोविंद म्हणतात की, फॅशन डिझायनर कपड्यांच्या माध्यमातून लोकांना ओळख मिळवून देतात आणि फॅशनला कलेपासून बिझनेसपर्यंत जोडतात.

फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त शिवणकाम?

सुनैना म्हणतात की, फॅशन डिझायनिंग अशा विद्यार्थांसाठी आहे, जे क्रिएटिव्ह आहेत आणि ज्यांच्यामध्ये कपडे, कापड उद्योग आणि दागिने किंवा फॅशनेबल वस्तू डिझाइन करायची आवड आहे.

त्या म्हणतात कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्स, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे.

आर्ट्सचे विद्यार्थी गोष्टी सांगण्याची पद्धत आणि संस्कृतीची जाण यामुळं ब्रँडिंग, फॅशन जर्नलिझम किंवा कॉस्च्युम डिझायनिंगमध्ये नाव कमवू शकता.

सायन्सचे विद्यार्थी तांत्रिक समज आणि लॉजिकमुळे नवीन प्रकारचे कापड तयार करणे, फॅशन टेक्नॉलॉजी किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये करिअर करू शकतात.

तसेच, कॉमर्सचे विद्यार्थी ज्यांना हिशोबाची आणि व्यवसायाची पक्की समज असेल ते फॅशन मर्चेंटायझिंग, रिटेल मॅनेजमेंट किंवा स्वतःचा फॅशन बिझनेस सुरू करू शकतात.

आयटी/कॉम्प्युटरचे विद्यार्थी डिजिटल फॅशन, ई-कॉमर्स स्ट्रॅटेजी किंवा 3D डिझायनिंगमध्ये कमाल दाखवू शकतात.

फॅशन डिझायनर

फोटो स्रोत, Getty Images

सृष्टी जायस्वाल यांच्या मते फॅशन डिझायनिंग सर्वांसाठी खुले आहे, पण यासाठी काही कौशल्ये असणे आवश्यक आहे.

क्रिएटिव्हिटी आणि नवनवीन आयडिया, उत्तम निरिक्षण आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याची समज, संयम.

प्रत्येक छोट्या तपशिलावर लक्ष देण्याची सवय, नवीन ट्रेंड आणि वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता, दररोज नवीन काही तरी शिकण्याची इच्छा.

सुनैना यांच्या मते, "सामान्य समजुतीनुसार फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ शिवणकाम असते. मात्र तसं नाही. धाग्यापासून कापड कसं कसा बनतं आणि ते बाजारापर्यंत कसं पोहोचतं, हे सर्व काही त्याच कामाचा भाग आहे.

फॅशन डिझायनरला बदलत्या ट्रेंडवर नजर ठेवावी लागते, फॅब्रिकचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व समजून घ्यावे लागते."

तासनतास स्केचिंग, प्रयत्न आणि सुधारणा आणि कठोर मेहनत, हे सर्व या व्यवसायात समाविष्ट आहे, असं त्या सांगतात.

जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रवक्त्या सृष्टी जायसवाल सांगतात की, डिझायनर आता केवळ बुटीकपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांच्यासाठी रिटेल, मीडिया, मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपोर्ट आणि उद्योजक बनण्याच्याही संधी आहेत.

फॅशन डिझायनिंग

फोटो स्रोत, Getty Images

सृष्टीच्या मते फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्यांसाठी अनेक मार्ग खुले होतात. ते फॅशन डिझायनर बनू शकतात, फॅशन स्टायलिस्ट बनू शकतात.

तुम्ही अपॅरल (कपडे) किंवा टेक्सटाईल (कापड) डिझायनर बनू शकता. फॅशन बायर किंवा मर्चेंटायझर म्हणजेच मालाची खरेदी-विक्री आणि नफा पाहणारा म्हणून काम करू शकता.

याशिवाय तुम्ही इलस्ट्रेटर (डिझाइन्सची सुंदर चित्रं काढणारा), कॉस्च्युम डिझायनर (वेशभूषाकार) होऊ शकता किंवा फॅशन कंटेंट क्रिएटर आणि कन्सल्टंट म्हणजेच फॅशनबद्दल योग्य सल्ला देणारा तज्ज्ञ म्हणूनही नाव कमवू शकता.

सुरुवातीला फॅशन डिझायनरला वार्षिक 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत पगार मिळून जातो. मात्र सीनियर डिझायनर, ब्रँड ओनर, कन्सल्टंट यापेक्षा कितीतरी जास्त पैसे कमावू शकतात.

पगाराबद्दल गौरव गोविंद सांगतात की, "कोणाला किती माहिती आहे, नवीन ट्रेंड समजण्यात ते किती वेगवान आहेत आणि त्यांचे काम कसे आहे, यावर पगार ठरतो. तरीही, सुरुवात दरमहा 30 हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान होऊ शकते."

कोणतं शिक्षण घ्यावं लागतं?

गौरव गोविंद सांगतात की बारावी नंतर कुणाला या क्षेत्रात यायचं असेल तर ते बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des) इन फॅशन डिझाईन, बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc) इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन फॅशन डिझाईन करू शकतात.

याशिवाय फॅशन स्टाईलिंग, पॅटर्न मेकिंग किंवा बुटीक मॅनेजमेंट सारख्या काही स्पेशलाईज्ड प्रोग्रामसाठी सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा असतात, ते तीन ते सहा महिन्यांत पूर्ण होतात.

कुणाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर ते मास्टर्स ऑफ डिझाईन (M.Des) किंवा पीजी डिप्लोमा करू शकतात.

फॅशन उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या माहितीनुसार या कोर्सेसच्या अभ्यासक्रमात खालील गोष्टी शिकवल्या जातात.

  • फॅशन इलस्ट्रेशन आणि स्केचिंग म्हणजे डिझाईन्सचं रेखाटन आणि चित्रकला
  • पॅटर्न मेकिंग आणि गार्मेंट कन्स्ट्रक्शन म्हणजे कपड्यांचे आकार ठरवणं आणि ते शिवून तयार करणं.
  • टेक्सटाईल सायन्स आणि फॅब्रिक नॉलेज म्हणजे कापडाचं विज्ञान आणि विविध प्रकारच्या कापडांची माहिती.
  • कॉम्प्युटर-अ‍ॅडेड डिझाईन (CAD) म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून डिझाईन्स बनवणं.
  • फॅशन मार्केटिंग आणि मर्चेंडायझिंग म्हणजे फॅशन प्रॉडक्ट्सची जाहिरात आणि त्यांची खरेदी-विक्री.
  • पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःच्या कामाचा एक उत्तम संग्रह (प्रोफाईल) तयार करणं.

आघाडीच्या इन्स्टिट्यूट कोणत्या?

नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू यासह भारताच्या वेगवेगळ्या भागांत यांचे 20 कॅम्पस आहेत. यामध्ये प्रवेश परीक्षेद्वारे (NIFTEE) प्रवेश होतो. त्यात क्रिएटिव्ह ॲबिलिटी टेस्ट आणि जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट असतात. याची एका सेमिस्टरची म्हणजे 6 महिन्याची फी दीड लाख रुपयांच्या आसपास असते.

इथून अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्सेस केले जाऊ शकतात. अहमदाबाद, गांधीनगर आणि बेंगळुरू मध्ये याचे कॅम्पस आहेत. प्रवेशासाठी NID सुद्धा वेगळी प्रवेश परीक्षा घेते. याची एका सेमिस्टरची म्हणजे 6 महिन्याची फी सुमारे सव्वा दोन लाख रुपयांच्या आसपास आहे.

फाइल फोटो

फोटो स्रोत, Getty Images

कोईम्बतूरची ही संस्था बीएससी इन टेक्सटाईल फॅशन, टेक्निकल टेक्सटाईल्स, टेक्सटाईल अँड अपॅरल डिझाईन, बीबीए इन टेक्सटाईल बिझनेस ॲनॅलिटिक्स सारखे कोर्सेस देते.

सोबतच इथे टेक्सटाईल मॅनेजमेंट, अपॅरल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, टेक्सटाईल बिझनेस ॲनॅलिटिक्स मध्ये एमबीए सुद्धा करू शकता. कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET) स्कोअरच्या आधारावर यामध्ये प्रवेश मिळतो.

फीबद्दल बोलायचे झाले तर अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी सुमारे सव्वा दोन लाख रुपये आणि एमबीएसाठी सुमारे पावणे तीन लाख रुपयांची गरज असते.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन (IIAD): येथून विद्यार्थी फॅशन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बीबीए आणि एमबीए करू शकतात.

याशिवाय काही खाजगी संस्था आहेत, ज्या B.Des आणि BBA व्यतिरिक्त M.Des, MBA सारखे फुल टाईम कोर्सेस ऑफर करतात आणि सोबतच येथे फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन, लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट सारखे काही शॉर्ट टर्म प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा घेतले जातात.

दिल्ली, मुंबई, जयपूर आणि बेंगळुरू सारख्या शहरांत यांचे कॅम्पस आहेत. यांच्या अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामच्या एका सेमिस्टरची फी सुमारे 3 लाख 60 हजार रुपये आहे आणि मास्टर्स प्रोग्रामची सुमारे तीन लाख रुपये प्रति सेमिस्टर आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)