मान्सून गेला, तरीही राज्यात पाऊस का पडतोय?

व्हीडिओ कॅप्शन, मान्सून गेला, तरीही राज्यात पाऊस का पडतो आहे?
मान्सून गेला, तरीही राज्यात पाऊस का पडतोय?

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतातून माघार घेतली असून त्यासोबतच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य मान्सूनच्या कालावधीतच बहुतांश पाऊस पडतो. यादरम्यान महाराष्ट्रात थंडरस्टॉर्म अर्थात वादळांमुळे पाऊस पडतो. राज्यात गेल्या दोन दिवसांत अशाच पावसानं हजेरी लावली आहे.