'मोदीजी सबका साथ, सबका विकास म्हणतात, पण त्यात मुस्लीम नसतात'

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी: सबका साथ, सबका विकास घोषणेवर मुस्लीम म्हणतात...
'मोदीजी सबका साथ, सबका विकास म्हणतात, पण त्यात मुस्लीम नसतात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितले आहे की त्यांचं सरकार देशातील सर्व जनतेला सोबत घेऊन जाण्याबद्दल कटिबद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे बजेट कमी तर झालंच आहे, शिवाय काही योजना बंद झाल्या, ज्यांचा थेट फायदा अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिमांना होत होता.

अनेक योजनांची व्याप्तीही कमी करण्यात आली. देशातील सर्वांत मोठा अल्पसंख्याक समुदाय असलेले मुस्लीम मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास'च्या घोषणेत कुठे आहेत?

बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहा हा स्पेशल रिपोर्ट.

शूट आणि एडिटिंग: शाहनवाज अहमद