गावाकडची गोष्ट : मनरेगा अंतर्गत विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान असं मिळवा
गावाकडची गोष्ट : मनरेगा अंतर्गत विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान असं मिळवा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार, महाराष्ट्रात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेन म्हटलं आहे.
त्यामुळे मग विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यासाठीची पात्रता काय आहे, यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, याचीच सविस्तर माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-83.





