डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने दलित वस्तीत लायब्ररी उभारणारा बुलढाण्याचा मोईन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने दलित वस्तीत लायब्ररी उभारणारा बुलढाण्याचा मोईन
बुलडाण्यातील सुल्तानपुरच्या एका दलित वस्तीत राहाणाऱ्या मोईनची ही स्वतःची लायब्ररी. त्याच्या लायब्ररीत 700 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत.
लोकांमध्ये पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी मोईनने त्याच्या मित्रासोबत Weread नावाची संकल्पना सुरू केलीये.
या माध्यमातून वाचकांना हवी असलेली पुस्तकं तो माफक दरात त्यांच्यापर्यंत पोस्टाने पोहोचवतो. मोईन सांगतो, ' जेव्हा मी सोशल मिडियावर आलो.
तेव्हा मी जी जी पुस्तकं वाचली होती त्यांचे अनुभव मी सोशल मिडीयावर इतरांसोबत शेअर करत होतो. ते अनेकांना आवडले.
तेथूनच माझ्या या पुस्तकांच्या अनुभवाची दखल शरद तांदळे सरांनी घेतली आणि मला पहिला वहिला वाचकाला देण्यात येणारा पुरस्कार “स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार” त्यांनी मला दिला. त्या पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये रक्कम, एक स्मृती चिन्ह आणि एक प्रमाणपत्र असं होतं.



