मळ्यातून कपपर्यंत कसा होतो कॉफीचा प्रवास?
मळ्यातून कपपर्यंत कसा होतो कॉफीचा प्रवास?
कॉफी हे जगातल्या लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. उन्हाळ्यात कोल्ड कॉफी असो की हिवाळ्यातली गरम कॉफी. समोर सुगंधी कॉफीचा कप आल्यावर त्याला नाही म्हणणारी व्यक्तीच दुर्लभ असते.
पण तुम्हाला माहितीये का, कॉफी कशी तयार होते?
कॉफिआच्या झाडावर येणाऱ्या या छोट्या फळांना चेरी कॉफी म्हणतात. पिकलेली ही फळं हाताने तोडली जातात.
त्यानंतर तोडलेली फळं उन्हात वाळवली की वरचं आवरण सुकतं आणि मग बिया काढल्या जातात. या कॉफीच्या बिया मशीनमध्ये मस्तपैकी सुकवल्या जातात.
त्यानंतर या बिया रोस्ट केल्या जातात...म्हणजे भाजल्या जातात. भाजलेल्या बियांची छान पूड केली की, कॉफी तयार होते. नंतर ती पॅक केली जाते आणि आपल्यापर्यंत येते.
गरम पाणी, दूध घालून मस्तपैकी गरमागरम कॉफीचा कप हातात घ्यायचा आणि अहाहा!
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






