रायगडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, नेमकं काय घडलं?
रायगडमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, नेमकं काय घडलं?
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली आहे.
मानसी यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी जवळपास पाच जणांनी भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केली.
या प्रकरणी खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली.
21 डिसेंबर रोजी खोपोली नगरपरिषदेचे निकाल जाहीर झाले. यात मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या.
त्यांच्या विरोधात संबंधित घटनेतील आरोपीच्या पत्नी या देखील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणुकीला उभ्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






