निवडणुकीआधी प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा, काय म्हणाले जगताप? - मुलाखत
निवडणुकीआधी प्रशांत जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा, काय म्हणाले जगताप? - मुलाखत
मुंबईत ठाकरे बंधू जवळपास दोन दशकांनंतर एकत्र आले आणि इकडे पुण्यात पवारांच्या कुटुंबातही नवे 'राजकीय' पूल बांधण्याबाबत चर्चा सुरू आहे.
गेल्या वर्षी लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई वगळता, तसंही इथं कौटुंबिक अशी दरी नव्हती जी ठाकरेंमध्ये दिसली होती.
लग्न समारंभांपासून ते शिक्षणसंस्थांच्या कार्यक्रमांपर्यंत, पवार कुटुंब एकत्र होतंच. पण कथित 'राजकीय' मतभिन्नताही फार काळ टिकली नाही.
पुणे आणि इतर काही महानगरपालिकांमध्ये दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र लढण्यासाठी चर्चा करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणुकीआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीबीसी मराठीने त्यांची मुलाखत घेतली आणि निवडणुकांसबंधी चर्चा केली.
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






