मुंबई महानगर पालिका शाळांचा दर्जा कधी सुधारणार? मुंबईतील पालक आणि शिक्षकांचा सवाल

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई महानगर पालिका शाळांचा दर्जा कधी सुधारणार? मुंबईतील पालक आणि शिक्षकांचा सवाल
मुंबई महानगर पालिका शाळांचा दर्जा कधी सुधारणार? मुंबईतील पालक आणि शिक्षकांचा सवाल

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती नेमकी कशी आहे? शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या सुविधा, मोडकळीस आलेल्या इमारती आणि रिक्त पदांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होतोय?

दादरमधील पालिका शाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलाला मिड-टर्ममध्येच खाजगी शाळेत टाकण्याचा एका पालकांना निर्णय घ्यावा लागला, त्यांच्यासारखेच अनेक पालक आज पालिका शाळांच्या दुरावस्थेमुळे चिंतेत आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणावर काय परिणाम होतोय याविषयी बीबीसी मराठीने पालक, शिक्षक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

महापालिकेच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी जवळपास 6.5 टक्के तरतूद आहे. पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा कधी सुधारणार याची

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही वाट पाहात आहेत.

रिपोर्ट- अल्पेश करकरे

शूट- शार्दुल कदम

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)