'पेट्रोल लॉबी श्रीमंत, प्रोपोगंडा केला'; इथेनॉलवरच्या टीकेबाबत नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
'पेट्रोल लॉबी श्रीमंत, प्रोपोगंडा केला'; इथेनॉलवरच्या टीकेबाबत नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
पेट्रोलमध्ये सुमारे 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित करण्याच्या प्रक्रियेवरून अजूनही प्रचंड टीका होत आहे. वाहनचालक दावा करत आहेत की त्यांच्या गाडीचं मायलेज कमी झालं आहे आणि इथेनॉल मिश्रणाचा गाडीच्या चालण्यावर, इंजिनच्या आयुष्यावरही परिणाम होणार आहे.
दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की, इथेनॉल मिश्रण केल्यामुळे मायलेजमध्ये अगदी नगण्य फरक पडतोय. उलट यामुळे देशात कच्चा तेलाची आयात कमी होतेय, मोलाचं परकीय चलन वाचतंय आणि याशिवाय शेतकऱ्यांचा फायदाही होतोय.
आता प्रथमच देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही यावर बोलताना म्हणालेत की, एका ठराविक लॉबीकडून सरकारला इथेनॉलच्या मुद्द्यावरून टार्गेट केलं गेलं.






