सोपी गोष्ट: प्रज्वल रेवण्णांविरोधात इंटरपोलने काढलेली 'ब्लू कॉर्नर नोटीस' म्हणजे काय?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: प्रज्वल रेवण्णा यांविरोधात इंटरपोलने काढलेली 'ब्लू कॉर्नर नोटीस' म्हणजे काय?
सोपी गोष्ट: प्रज्वल रेवण्णांविरोधात इंटरपोलने काढलेली 'ब्लू कॉर्नर नोटीस' म्हणजे काय?

कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत आणि त्यांच्याविरोधात आता 'ब्लू कॉर्नर नोटीस' बजावण्यात आलेली आहे. प्रज्वल रेवण्णा खासदार असल्याने त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे आणि याचाच वापर करत ते जर्मनीला गेल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

इंटरपोल ही अशी संस्था आहे जी जगभरातल्या पोलीस खात्यांना एकमेकांशी तंत्रज्ञानाने आणि प्रत्यक्षरीतीने जोडते. जगातली ही एकमेव अशी संस्था आहे ज्यांना जगभरातल्या पोलीस यंत्रणांकडे असलेली माहिती शेअर करण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्याकडे तसं तंत्रज्ञान आहे.

इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस काय आहे? या नोटिशीमुळे काय होईल? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - अमृता दुर्वे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे