ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधी कराराची घोषणा, यानंतर गाझातील वातावरण कसं आहे? हमास-नेतन्याहू काय म्हणाले?

मध्य गाझामधील विस्थापित लोकांच्या छावणीत तंबूखालून मुले बाहेर डोकावताना ( 7 ऑक्टोबरचा फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मध्य गाझामधील विस्थापित लोकांच्या छावणीत तंबूखालून मुले बाहेर डोकावताना ( 7 ऑक्टोबरचा फोटो)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, इस्रायल आणि हमास यांनी गाझामध्ये युद्धबंदी आणि शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, "सर्व ओलिसांना लवकरच सोडण्यात येईल" आणि "इस्रायल आपलं सैन्य मान्य करण्यात आलेल्या सीमा रेषेपर्यंत मागे घेईल."

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या कराराला "इस्रायलसाठी एक मोठा दिवस" असं ​​म्हटलं आहे. तसेच, त्यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) कराराला मान्यता देण्यासाठी त्यांच्या सरकारची बैठक बोलावण्याचीही घोषणा केली.

जर इस्रायलच्या सरकारनं या कराराला मान्यता दिली, तर युद्ध संपवण्याचा, इस्रायली ओलिसांची आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याचा, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होईल.

या कराराला मंजुरी देण्यासाठी इस्रायल सरकार गुरुवारी (9 ऑक्टोबर) बैठक होणार आहे.

हा करार मंजूर झाल्यानंतर, शस्त्रसंधी तात्काळ लागू होईल.

बीबीसीचे प्रतिनिधी रश्दी अबू अलोफ यांनी गाझा येथे मिळवलेले हे फोटो शांतता करारावरील चर्चेच्या तिसऱ्या दिवसाचे आहेत.
फोटो कॅप्शन, बीबीसीचे प्रतिनिधी रश्दी अबू अलोफ यांनी गाझा येथे मिळवलेले हे फोटो शांतता करारावरील चर्चेच्या तिसऱ्या दिवसाचे आहेत.

हमासनेही कराराला दुजोरा दिला आहे. परंतु, या देवाणघेवाणीत इस्रायल ज्या कैद्यांना मुक्त करणार आहे त्यांची अंतिम यादी अद्याप हमासला मिळालेली नाही.

मात्र, अद्याप या कराराच्या पूर्ण अटी सार्वजनिक केलेल्या नसल्या, तरी पंतप्रधान मोदी यांच्यासह जगभरातील नेते या कराराचं स्वागत करत आहेत. इस्रायली बंधकांचे कुटुंबीय आणि युद्धामुळे विस्थापित झालेले पॅलेस्टिनी यांनादेखील या करारामुळे दिलासा मिळाला आहे.

या करारासाठीच्या वाटाघाटी इजिप्तमध्ये झाल्या. या वाटाघाटींमध्ये इजिप्त सरकारसह कतार, अमेरिका आणि तुर्की यांनीही मध्यस्थांची भूमिका बजावली.

या करारामध्ये कोणत्या गोष्टी ठरल्या आहेत?

शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या टप्प्याची संपूर्ण माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार:

  • एका पॅलेस्टिनी सूत्रानं बीबीसीला सांगितलं की, या करारामुळे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने ताब्यात घेतलेल्या 250 पॅलेस्टिनी कैद्यांची आणि गाझा येथील 1700 रहिवाशांची सुटका होईल.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल ज्या कैद्यांना सोडण्याची योजना आखत आहे त्यांची यादी हमासला अद्याप मिळालेली नाही, परंतु लवकरच हे प्रकरण सोडवलं जाईल, अशी आशा आहे.
सर्व ओलिसांना लवकरच सोडण्यात येईल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्व ओलिसांना लवकरच सोडण्यात येईल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
  • एका वरिष्ठ पॅलेस्टिनी अधिकाऱ्यानं सांगितलं की, या करारानुसार इस्रायल दररोज मदत पुरवठा करणारे 400 ट्रक गाझामध्ये प्रवेश करू देईल आणि नंतरच्या टप्प्यात ही संख्या वाढवली जाईल.
  • व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात हमास 20 इस्रायली ओलिसांची सुटका करेल.

गाझा हे सुरक्षित ठिकाण असेल - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हटलं, "इस्रायल आणि हमास या दोघांनीही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे."

ट्रम्प म्हणाले, "याचा अर्थ असा आहे की सर्व ओलिसांची लवकरच सुटका केली जाईल आणि इस्रायल आपल्या सैन्याला ठरवण्यात आलेल्या सीमेपर्यंत मागे घेईल. मजबूत, चिरस्थायी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या शांततेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. सर्व पक्षांना योग्य वागणूक दिली जाईल."

"अरब आणि मुस्लीम जगासाठी, इस्रायलसाठी, शेजारी देशांसाठी तसेच अमेरिकेसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही कतार, इजिप्त आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थांचे आभार मानतो ज्यांनी आमच्याबरोबर मिळून हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करार घडवून आणला. धन्य आहेत ते लोक जे शांतता प्रस्थापित करतात," असं ट्रम्प यांनी म्हटलं.

ग्राफिक कार्ड

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "तुम्हाला दिसेल की, लोक एकमेकांशी सलोख्याने राहत आहेत आणि गाझाची पुनर्बांधणी केली जाईल. आता जग वेगळे असेल, गाझाच्या विकासासाठी पैसा खर्च केला जाईल."

"गाझा आता एक सुरक्षित ठिकाण असेल. आता लोकांची काळजी घेतली जाईल. मला खरोखर वाटते की, संपूर्ण मध्य पूर्व आता एकत्र आला आहे. गाझाची पुनर्बांधणी केली जाईल आणि शेजारी देश त्यास मदत करतील", असंही ते पुढे म्हणाले.

"मला पूर्ण विश्वास आहे की आता मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होईल," असंही त्यांनी नमूद केलं.

इस्रायल आणि हमासची प्रतिक्रिया

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले, "इस्रायलसाठी हा मोठा दिवस आहे."

नेतान्याहू यांनी इस्रायली लष्कर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.

बीबीसीच्या यूएस सिस्टर चॅनेल सीबीएसच्या मते, हमासने म्हटले आहे की, या करारामुळे "गाझामधील युद्ध संपेल, ताब्यात घेतलेल्या सैन्याची पूर्ण माघार सुनिश्चित होईल, मानवतावादी मदतीच्या प्रवेशास परवानगी मिळेल आणि कैद्यांची अदलाबदल लागू होईल".

आनंद साजरा करणारे तरूण

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, गाझामध्ये शांतता कराराच्या बातमीनंतर आनंद साजरा करणारे पॅलेस्टिनी

संघटनेने ट्रम्प आणि इतर आवाहन केले केले, "इस्रायलच्या ताब्यात असलेले सरकार कराराच्या सर्व अटींचे पूर्णपणे पालन करेल याची खात्री करा".

हमासने म्हटले आहे की, गाझाच्या लोकांनी "धैर्य आणि दृढनिश्चय दर्शविला आहे."

"स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णयाचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही आमच्या लोकांचे राष्ट्रीय हक्क सोडणार नाही," असे निवेदनात म्हटले आहे.

गाझा आणि इस्रायलमधील प्रतिक्रिया कशी आहे?

गाझाच्या दक्षिणेकडील खान युनूस शहरात लोक रात्रभर रस्त्यावर आनंद साजरा करताना दिसले.

दुसरीकडे, तेल अवीवच्या ओलीस चौकात, ओलीस ठेवण्यात आलेल्या एका इस्रायली तरुणाच्या आईने फटाके फोडले आणि आपल्या मुलाच्या परतण्याची आशा व्यक्त केली.

'होस्टेज फॅमिलीज फोरम'ने एका निवेदनात म्हटले, "आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे."

आनंद साजरा करणाऱ्या तरूणी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, या करारानंतर इस्रायलचे लोक आनंद व्यक्त करताना दिसले

गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आलेला इस्रायली नागरिक मतान झंगाऊकरच्या आईने एक्सवर लिहिले, "मतान माझ्याकडे परत येत आहे. आपल्या बहिणी नताली आणि शानी यांच्याजवळ तसेच आपल्या आयुष्यातलं प्रेम, इलानाजनळ."

गेल्या 2 वर्षांतील ही तिसरी शस्त्रसंधी आहे. दोन्ही बाजूंना आता आशा आहे की, ही संघर्षाच्या समाप्तीची सुरुवात ठरेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)