सुदानमध्ये लष्करी संघर्षात महिलांना 'असं' लक्ष केलं जातंय

व्हीडिओ कॅप्शन, सुदानमध्ये लष्करी संघर्षादरम्यान बलात्कार, अनेक पीडित महिला आल्या समोर
सुदानमध्ये लष्करी संघर्षात महिलांना 'असं' लक्ष केलं जातंय

एप्रिलमध्ये सुदानच्या नियमित सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून डझनभर महिलांनी सुदानमध्ये बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संघटनांनी जुलैमध्ये प्रकाशित केलेल्या संयुक्त निवेदनात असं म्हटलं आहे की लैंगिक हिंसाचाराचा वापर "लोकांना घाबरवण्यासाठी युद्धाचा डाव" म्हणून केला जातो. त्यात असंही नमूद करण्यात आलं आहे की संघर्ष सुरू झाल्यापासून, यूएन मानवाधिकार कार्यालयाला किमान 57 महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या 21 हून अधिक घटनांचे "विश्वासार्ह अहवाल" प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये केवळ एका घटनेत 20 महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.

बीबीसी अरेबिकचे मोहम्मद उस्मान देशभरातील अनेक महिलांपर्यंत पोहोचले आहेत ज्यांनी RSF सैनिकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटलं आहे.

व्हिडिओ - लीना शेखौनी आणि अब्देलरहमान अबुतालेब

ग्राफिक्स/अॅनिमेशन - जिला दस्तमलची

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)