सनी फुलमाळी : वडिलांनी दारोदारी फिरून बेंटेक्सचे दागिने विकत घडवला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान

व्हीडिओ कॅप्शन, वडिलांनी बेंटेक्स दागिने विकून घडवला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान
सनी फुलमाळी : वडिलांनी दारोदारी फिरून बेंटेक्सचे दागिने विकत घडवला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान

बहरीनमध्ये झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 17 वर्षीय सनी फुलमाळीने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे.

गरिबी, घरी वीज-पाण्याचा अभाव आणि झोपडपट्टीतील जीवन अशा कठीण परिस्थितीतून सनीने आपला मार्ग स्वतः घडवला. सनीचे वडील दारोदारी फिरून बेंटेक्सचे दागिने विकत होते, आणि त्याच पैशांतून मुलाला कुस्तीचं प्रशिक्षण दिलं. तसंच एका वस्तादांनी सनीचं कौशल्य पाहून त्याला दत्तक घेतलं.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)