मानवी शरीररचनेत निसर्गाने केल्यात 'या' 5 गंभीर चुका

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्शियल एस्कुरेडो
- Role, बीबीसी कन्व्हर्जन
न्यूरोलॉजिस्ट आणि मनोविश्लेषण संशोधक सिग्मंड फ्रॉईड म्हणाले होते, “केवळ दोन वैज्ञानिक शोधांमुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाला. पहिला शोध म्हणजे, पृथ्वी हे विश्वाचे केंद्र नाही. आणखी दुसरा शोध म्हणजे पृथ्वी ही 4.5 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेली असून मानव हा पृथ्वीवर काही लाख वर्षांपूर्वीच जन्माला आला.
याचाच अर्थ, मानव अस्तित्वात येण्यापूर्वी कितीतरी वर्षे पृथ्वीची निर्मिती झालेली होती.
पण पृथ्वी तयार झाल्याच्या कोट्यवधी वर्षांनंतर मानव या जगात येऊनसुद्धा मानवाची शरीररचना निसर्गाने नीट केलेली नाही. या संचरनेत अनेक दोष असून त्याची प्रचिती आपल्याला अनेकवेळा येत असते.
1. पुरुषांची प्रजनन यंत्रणा
निसर्गाने मानव पुरुषांची प्रजनन यंत्रणा तयार करताना त्यावर अन्याय केला आहे.
किंबहुना पुरुष प्रजनन प्रणाली पाहिल्यास आपल्या शरीराची रचना किती वाईट पद्धतीने करण्यात आली आहे, हे दिसून येतं.
पुरुषाच्या लिंगासारखा इतका नाजूक अवयव बाहेरून जोडल्यासारखा बनलेला आहे. हे एक योग्य डिझाईन नक्कीच नाही.
हृदय आणि फुफ्फुसांप्रमाणे ते शरीराच्या आत सुरक्षित ठेवता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण तसं न होता ते बाहेर संवेदशील स्थितीत असतं.
शिवाय, मानवी शरीराचं तापमान 36.5 डिग्री सेल्सियस (98.6 फॅरेनहाईट) तापमानापेक्षा जास्त तापमानात शुक्राणूंचा विकास योग्यरित्या होऊ शकत नाही. उष्णतेमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो.
आपल्याला हे तापमान कमी करण्याचे मार्ग माहीत आहेत, म्हणून आपलं काम चालून जातं.
पण, बेडूक आणि मासे यांचा विचार केल्यास ते थंड रक्ताचे प्राणी आहेत, पण त्यांच्या शरीरातील प्रजननासाठीचे अवयव सुरक्षितरित्या ठेवता येईल, अशी रचना निसर्गाने केलेली आहे.
इतकंच नव्हे तर हत्तीसारख्या गरम रक्ताच्या प्राण्यातही पुरुष जातीच्या प्राण्याचं लिंग सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था असते, अशी रचना मानवामध्ये दिसून येत नाही.
2. मणक्याची उभी रचना
आपल्या शरीराचं डिझाईन वाईट करण्यात आलं आहे, याचं आणखी एक उदाहरण म्हणजे आपला मणका.
कधीच पाठदुखी उद्भवली नाही, असा एकही माणूस या पृथ्वीतलावर सापडणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
चतुष्पाद म्हणजेच चार पायांच्या प्राण्यांना तिरकस पद्धतीचे मणके असतात. मणक्याच्या वक्रतेमुळे त्यांच्या शरिराची रचना वक्राकार असते.
परंतु, याबाबतील माणूस प्राणी अपरिपक्व मानला जातो. मनुष्याचा पाठीचा कणा ताठ असतो. सरळ रेषेतील मणक्यात एकमेकांवर मणी असतात.
अशा रचनेमुळे खालील भागावर जास्तीचा भार पडतो. यामुळे खालील मण्यांना जास्त ऊर्जेची गरज भासते.
हे संतुलन राखण्याच्या प्रयत्नात माणसाला पाठदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
3. मानवी डोळ्यातील ब्लाईंड स्पॉट्स
मानवी शरीराच्या सदोष रचनेचे आणखी एक उदाहरण म्हणजे डोळ्यातील ब्लाईंड स्पॉट्स.
माणसाचे डोळे हे रेटिना फोटोरिसेप्टरने झाकलेले असतात. प्रकाश मिळाल्यानंतर ऑप्टिक नर्व्ह म्हणजेच डोळ्यातील रक्तवाहिनीमार्फत ते मेंदूपर्यंत पोहोचतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण ऑप्टिक नर्व्हच्या पुढील भागात म्हणजेच पापण्यांमध्ये फोटो रिसेप्टर नसतात. त्यामुळे डोळे झाकल्यानंतर प्रकाश मिळू शकत नसल्याने तिथे आपण दृष्टिहीन होतो. याला ब्लाईंड स्पॉट असं संबोधण्यात येतं.
पण आपल्यासारखीच रचना असलेल्या ऑक्टोपसचा विचार केल्यास त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या त्याच्या दृष्टीत कोणताही अडथळा निर्माण करत नाही. त्यामुळेच त्यांना अशा पद्धतीने ब्लाईंड स्पॉट्सचा त्रास नाही.
4. श्वसनयंत्रणा
मानवी श्वसनयंत्रणाही अत्यंत वाईटरित्या डिझाईन करण्यात आला आहे, असं तुम्हाला सांगितलं तर?
कारण, कोणत्याही कारणास्तव श्वसनयंत्रणेत अडथळा आल्यास निरोगी व्यक्तीही क्षणात मृत्यूमुखी पडू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
साधारणपणे, माणसाचं अन्नग्रहण किंवा पाणी पिणं हे तोंडावाटे होतं. याच मार्गाने श्वासोच्छवासाची प्रक्रियाही होते. या प्रक्रियेत गडबड झाल्यास समस्या येऊ शकतात.
गुंतागुंतीच्या या यंत्रणेत अन्न कधीकधी चुकून श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते, असं घडल्यास गुदमरून मृत्यूची शक्यताही असते.
गेल्या वर्षी स्पेनमध्ये स्पेनमधील गळा दाबल्यामुळे किंवा गुदमरल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या ही कार अपघातांत मृत्यू ओढावलेल्या लोकांपेक्षाही दुप्पट होती, हे विशेष.
5. व्हिटॅमिन सीची सातत्याने आवश्यकता
सुमारे 500 वर्षांपूर्वी, मॅगेलन आणि अल्कोआ या पोर्तुगीज संशोधकांसह 250 खलाशी जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले होते. पण त्यापैकी केवळ 18 जण जगप्रदक्षिणा पूर्ण करू शकले. त्याचं सर्वात मोठं कारण होतं व्हिटॅमिन सी.

फोटो स्रोत, Getty Images
सागरी प्रवासादरम्यान स्कर्व्ही ही प्रचंड मोठी समस्या आहे. स्कर्व्ही हा आजार व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. दीर्घ काळ ताजं अन्न न खाल्यास हा आजार बळावतो.
शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी न मिळाल्यास कोलेजन नामन प्रोटीनचे समीकरण बिघडतं. शिवाय, शरीरातील अनेक ऊतींना प्रथिनांची गरज असते, त्यामुळे परिस्थिती बिकट बनते.
शास्त्रज्ञांच्या मते, मानवी शरीरात हे व्हिटॅमिन सीची निर्मिती होण्यासाठीची प्रणाली अपुरी आहे.
मानवी शरीर व्हिटॅमिन सी तयार करू शकत नाही, त्यामुळे ते बाहेरून घ्यावं लागतं.
ताज्या भाज्या, फळे यांच्या माध्यमातून ते शरीरापर्यंत पोहोचतं. त्यामुळे मानव प्राण्याच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता होऊ देता कामा नये.
पण, मांजरासारख्या प्राण्यांना हा त्रास कधीच जाणवत नाही, कारण त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन सी तयार करण्याची यंत्रणा आहे. म्हणूनच मांजरीला स्कर्व्हीसारखे आजार कधीच होत नाहीत.
उत्क्रांतीमुळे झाला परिणाम?
माणूस आधी चार पायांवर चालायचा. त्यानंतर तो हळूहळू उभा राहून दोन पायांवर चालू लागला, हे आपल्याला माहीत आहे.
पण, या उत्क्रांतीच्या काळात मानवी शरीराचा विकास योग्यरित्या झाला नाही, याचे बरेच पुरावे आढळून येतात.
यामध्ये वरील पाच प्रमुख चुकांसह मादीचं जननेंद्रिय, पायातील विकृत हाडे, रक्ताच्या गुठळ्या, कोपर आणि जनुकांचाही समावेश होतो.
पूर्वीच्या काळी इतर सजीवांप्रमाणेच शारीरिक शक्ती आणि बुद्धिमत्ता असलेला माणूस प्राणी होता, पण उत्क्रांतीच्या काळात झालेल्या बदलांमुळे शरिररचनेच्या विकासात काही अडथळे आल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे.
बदलादरम्यान आपले मानवाचा फायदाही झाला, पण त्याचवेळी आपल्याला इतर काही गोष्टी स्वीकाराव्या लागल्या आहेत. यामध्ये आपला काहीच दोष नाही. हा सगळा उत्क्रांतीचा भागही असू शकतो.
(मार्शियल एस्कुडेरो हे स्पेनच्या सेव्हिल विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत. हा लेख मूळतः बीबीसी कन्व्हर्जन वेबसाइटवर प्रकाशित झाला होता. तो येथे क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याअंतर्गत प्रकाशित केला गेला आहे.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








