MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, नेमक्या मागण्या काय आहेत?
MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, नेमक्या मागण्या काय आहेत?
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षेची वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी MPSC ची तयारी करणारे हजारो विद्यार्थी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरले आहेत.
परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना, वयोमर्यादेच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांशी बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी संवाद साधला आहे. पाहा विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






