आँग सान सू ची अटकेत, म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी बंड

व्हीडिओ कॅप्शन, आँग सान सू ची अटकेत, म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी बंड

म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून लोकशाही नेत्या आंग सान सू ची यांना अटक केली आहे. देशात 2011 मध्ये लष्करी राजवट संपुष्टात आली होती. सू ची राष्ट्राध्यक्ष नसल्या तरी त्यांच्याकडेच म्यानमारच्या नेत्या म्हणून पाहिलं जातं.

त्यांच्या पक्षाने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. भारताने या घटनाक्रमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाहू या म्यानमारमधल्या या घटनांचे ताजे अपडेट्स.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)