अमेरिकन निवडणूक 2020 : ‘कोरोनाला घाबरू नका,’ असं डोनाल्ड ट्रंप का आणि कुणाला सांगतायत?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप कोरोनावर उपचार घेऊन तीन दिवसांनंतर वॉटर रिड रुग्णालयातून व्हाईट हाऊसला घरी परतले. त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी हॉस्पिटल ते घर हा प्रवासही एक टीव्ही सोहळ्यासारखा घडवून आणला.
रुग्णालयाबाहेर पडल्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसेपर्यंत त्यांनी मास्क घातला होता. आणि व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर पायऱ्या चढून वर गेल्यावर ते बाल्कनीत फोटो सेशनसाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी मास्क काढूनही ठेवला. ट्रंप यांच्यावर झालेले उपचार आणि रुग्णालयातले तीन दिवस यावर बीबीसीचा खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)