इंदरजीत कौर: भारत-पाकिस्तान फाळणीनंतर निर्वासितांसाठी काम करणारी महिला

व्हीडिओ कॅप्शन, इंद्रजीत कौर : भारत-पाकिस्तान फाळणीनंतर निर्वासितांसाठी काम करणारी महिला

इंदरजीत कौर पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू तसंच स्टाफ सर्व्हिस कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. इंदरजीत कौर यांनी महिलांचे अधिकार आणि त्यांच्या प्रगतीसाठी अनेक नवे रस्ते खुले केले.

भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान त्यांनी माता साहेब कौर दलाची स्थापना करण्यात मदत केली. त्यांनी निर्वासितांना धान्य, वस्तू देण्यापासून ते त्यांच्या पुनर्वसनापर्यंत सगळ्या गोष्टींत मदत केली. इंद्रजीत कौर यांनी निर्वासित मुलांसाठी माता साहिब कौर दल शाळा सुरू करण्यातही मोलाची भूमिका बजावली. तसंच त्यांनी निर्वासित महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही दिले.

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)