मुथुलक्ष्मी रेड्डी : देवदासीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कायदा संमत करून घेणारी महिला
बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी', त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.
या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.
'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी’.
मुथुलक्ष्मी यांनी मद्रास विधिमंडळात अनेक कायदे पारित करायला मदत केली. देवदासी प्रथेवर बंदी घालणारा सगळ्यांत महत्त्वाचा कायदा यात येतो. या कायद्यामुळे देवदासी प्रथा संपवण्यात मदत झाली. देवदासी प्रथेमुळे अनेक मुलींचं, महिलांचं शोषण व्हायचं.
या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?
- मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या रुकैया हुसेन
- सुगरा हुमायूँ मिर्झा : बुरखा प्रथेचा अडसर दूर करत स्त्रियांचा आवाज बुलंद करणारी रणरागिणी
- चंद्रप्रभा सैकयानी: अविवाहित माता जिने आसाममधली पडदापद्धत संपवली
- रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला
- फाळणीतल्या निर्वासितांना आधार देणाऱ्या इंदरजीत कौर
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)