रुकैया हुसेन : मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी महिला

व्हीडिओ कॅप्शन, मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या रुकैया हुसेन

साधारण120 वर्षांपूर्वी रुकैया सखावत हुसेन यांच्या एका लेखाने खळबळ माजवली होती.

‘स्त्री जातिर अबोनोति’ या लेखात त्यांनी महिलांच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.1910मध्ये भागलपूर आणि 1911मध्ये कलकत्त्यात त्यांनी शाळा उघडल्या. लोकांचा विरोध असतानाही त्यांनी या शाळा सुरू ठेवल्या.

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी’.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)