सुगरा हुमायूँ मिर्झा : बुरखा प्रथेचा अडसर दूर करत स्त्रियांचा आवाज बुलंद करणारी रणरागिणी

व्हीडिओ कॅप्शन, सुगरा हुमायूँ मिर्झा यांच्या संघर्षाने स्त्रियांच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी पाया रचला.

महिला, विशेषतः मुस्लीम महिलांचं आयुष्य सुधारण्यासाठी आवाज उठवणाऱ्या लेखिका, संपादिका, संघटक, समाजसुधारक, साहित्यिका आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुगरा हुमायूँ मिर्झा यांच्याकडे बघितलं जातं.

सर्वात आधी त्यांनी स्वतःला बुरख्याच्या जोखडातून मुक्त केलं. बुरखा न घालता घराबाहेर पडणाऱ्या हैदराबादच्या दख्खन भागातल्या त्या पहिल्या मुस्लीम महिला असल्याचं मानलं जातं. बुरख्याशिवाय घराबाहेर पडणं त्यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही.

'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)