रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला

व्हीडिओ कॅप्शन, रखमाबाई राऊत: मर्जीविरूद्ध झालेलं लग्न धुडकावून लावणारी महिला

रखमाबाई राऊत ओळखल्या जातात त्या 1884-90 या काळात गाजलेल्या एका खटल्यासाठी आणि त्याहूनही त्यांच्या 'माझ्या संमतीशिवाय झालेल्या लग्नात मी नांदणार नाही, मला तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी चालेल' या ठाम भूमिकेसाठी.

पुढे त्यांच्याच खटल्यामुळे ब्रिटीशकालीन भारतात 'संमतीवयाचा कायदा 1891’ लागू झाला.

बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.

या मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)