इस्लामिक स्टेटच्या माजी कट्टरतावाद्यांवर विश्वास ठेवणं धोक्याचं?

व्हीडिओ कॅप्शन, इस्लामिक स्टेटच्या माजी कट्टरवाद्यांवर विश्वास ठेवणं धोक्याचं?

इस्लामिक स्टेटच्या पाडावानंतर सीरियातले डिटेंशन कँप हे त्यांच्या पत्नी, मुलं आणि कुटुंबाने भरले आहेत. या अनाथ मुला-मुलींना आणि त्यांच्या मातांना परत मायदेशी स्थान द्यायचं का? असा अनेक देशांना आता प्रश्न पडला आहे.

टर्कीच्या गल्लीबोळातून ते आशियापर्यंत आम्ही एका कुटुंबाचा प्रवास टिपलाय. हे लोक सीरियातल्या इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांचं काय करावं हे संबंधित देशातल्या सरकारांना समजत नाहीये. ही अनेक देशांची समस्या बनलीये.

इंडोनेशियात असे काहीजण परतले आहेत. पण त्याचा गंभीर परिणाम झालाय. नक्की काय घडलंय? याविषयी बीबीसी प्रतिनिधी क्वेंटन सॉमरवील आणि कॅमेरामन डॅरेन कॉनवे आपल्याला सांगत आहेत.

News image

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)