IS च्या प्रचारतंत्राला बळी पडून 'ते' सीरियात दाखल झाले आणि...
वर्षानुवर्षं चाललेली लढाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले प्रयत्न यामुळे इस्लामिक स्टेटचा पाडाव शक्य झाला. या संघटनेचे म्होरके आणि तिला धार्मिक मार्गदर्शन करणारे नेते आता नाहीएत.
पण, म्हणून या चळवळीचा आणि संघटनेचा अंत झालाय का? इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना असली तरी तिचा बाज वेगळा होता. संघटनेचे सैनिक एकटे लढत नाहीत, ते आपल्या कुटुंब कबिल्यासह फिरतात. संघटना नेस्तनाबूत झाली.
पण, त्यातल्या लोकांचं पुढे काय झालं? एकट्या सीरियात सत्तर हजारांच्या वर लोक अजूनही राहतात. आणि त्यातली दहा हजार मुलं आहेत. आज हे लोक कशा परिस्थितीत राहतात?
बीबीसीचे मध्य-पूर्व आशियाचे प्रतिनिधी क्विंटन सॉमरविल आणि कॅमेरामन डॅरन कॉनवे यांनी तयार केलेला हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
