Corona Virus: चीनमधला घातक आजार रोखण्यास हे मास्क सक्षम आहेत का?- पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, मास्कचं आवरण आजार रोखतं?

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आता एकप्रकारची दहशत आहे. चीनमधून आलेल्या लोकांची कसून चौकशी होतेय, वैद्यकीय तपासणी होतेय, तर अनेक देशांनी प्रवासबंदीही लादलीये.

आतापर्यंत मृतांचा आकडा 400 पार गेल्यामुळे साहजिक सामान्या नागरिकही बचावात्मक उपाय शोधत आहेत आणि करत आहेत. त्यापैकी एक म्हणून, जगभरात अनेक ठिकाणी मास्क घातलेले लोक दिसत आहेत. त्यामुळे मास्कची मागणीही वाढली आहे.

मात्र या मास्कच्या उपयुक्ततेविषयी शास्त्रज्ञ काहीसे साशंक आहेत. बहुतांश फेस मास्क व्हायरसपासून संपूर्ण संरक्षण करू शकत नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)