पाहा व्हीडिओ : जगभरात लोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : दुर्मिळ ऑर्गनला पुनरुज्जीवित करणार अवलिया

रत्नागिरी जिल्ह्यातल्या उमाशंकर दाते यांना संगीताची आवड होती. 2001 साली त्यांनी पहिल्यांदा ऑर्गनचे सूर अनुभवले. त्यानंतर त्यांना वाटू लागलं आपल्याकडे ऑर्गन असावं.

पण हे ऑर्गन इतकं दुर्मीळ होतं की ते मिळणं देखील कठीण होऊन बसलं. त्यांना कळलं की अतिशय गुंतागुंतीची रचना असलेल्या या वाद्याची निर्मिती होणं 1950 नंतर थांबलं आहे.

भारतीय नाट्यसंगीतामध्ये ऑर्गन या वाद्याला खूप महत्त्व होतं. पण काळाच्या ओघात या वाद्याची निर्मिती मागे पडली.

अतिशय सुरेल सूर निघणाऱ्या या वाद्याचं पुनरुज्जीवन व्हावं या वाद्याला संजीवनी मिळावी अशी तळमळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या उमाशंकर दाते यांना वाटू लागली. आपणच हे वाद्य का बनवू नये असा विचार त्यांनी केला.

आज ते स्वतः ऑर्गन तयार करत आहेत.

रिपोर्टिंग आणि शुटिंग - मुश्ताक खान

एडिटिंग- तुषार कुलकर्णी

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)