अॅपल झाली ट्रिलियन डॉलर कंपनी, पण या कंपन्या फार मागे नाहीत

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 1000 अब्ज डॉलर बाजारमूल्य असलेली कंपनी

अॅपल ही एक ट्रिलियन डॉलर म्हणजेच एक लाख कोटी डॉलर बाजारमूल्य असलेली जगातील पहिली कंपनी ठरली आहे. अॅपलला दरवर्षी 60 अब्ज डॉलरचा नफा होतो.

इतर कंपन्याही अॅपलच्या फार पाठीमागे नाहीत. गुगल ज्या कंपनीचा भाग आहे ती कंपनी म्हणजेच अल्फाबेटचं बाजारमूल्य लवकरच 900 अब्ज डॉलर होणार आहे.

असंही म्हटलं जात आहे की शेअर मार्केटचे भाव आता यापेक्षा जास्त होणार नाहीत. त्याचा परिणाम अॅपलवर होऊ शकतो. पण तूर्तास तरी अॅपलनं इतिहास रचला आहे हे नक्की.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)