तुम्ही सतत मोबाईलवर गेम खेळत बसले असाल तर हे पाहा

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - तुम्ही सतत मोबाईलवर गेम खेळता का? हा एक मानसिक असू शकतो

जर तुम्ही रात्रंदिवस कँडी क्रश, टेंपल रन, अँग्री बर्ड्स खेळत असाल तर सावधान! हा एक मानसिक आजार असू शकतो!

मोबाईलवर किंवा काँप्युटरवर सतत गेम खेळणं हा एक मानसिक आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. गेम खेळणं हा बऱ्याच लोकांसाठी टाईमपास असेल पण काही लोकांना त्याचं व्यसनही लागू शकतं.

जर तुम्हीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपला खिळून असाल, आणि जर त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल, तर काळजी घ्या.

हे व्यसन फार कमी लोकांना होतं, असं WHOने सांगितलंय, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)