व्हीडिओ : ब्राझीलमध्ये गीर गाय देतेय दिवसाला 60 लीटर दूध

व्हीडिओ कॅप्शन, गुजरातची गीर गाय ब्राझीलमध्ये दिवसाला 60 लीटर दूध कसं काय देऊ शकते?

1960 मध्ये 'कृष्णा' नावाची गीर गाय ब्राझीलच्या एक शेतकऱ्याला भेट म्हणून मिळाली होती.

गुजरातच्या या गीर गाईवर संकरण करून त्यापासून 'गिरोलान्डो' नावाची नवी जात तयार करण्यात आली.

ब्राझीलची ही गीर गाय दिवसाला सरासरी 60 लीटर दूध देते. त्यापैकी 80% दूध हे गिरोलान्डो या गीरच्या संकरित गायीचं आहे.

गेल्या 20 वर्षांत ब्राझीलमधलं दूध उत्पादन चौपट वाढलं आहे.

आता भारतातील अनेक राज्य सरकार गिरोलान्डो बैलाचं वीर्य आयात करण्याची योजना आखत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)