'क्रांतिसिंह' नाना पाटील आज असते तर...
क्रांतिसिंह नाना पाटील यांची लेक हौसाबाई पाटील यांनी प्रतिसरकारच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता.
स्वातंत्र्याच्या लढ्यात इंग्रजांच्या विरोधात दक्षिण महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या प्रतिसरकार( पत्री सरकार)ला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि नाना पाटलांच्या कन्या हौसाबाई पाटील या कार्यकर्त्यांचं भक्कम पाठबळ मिळालं होतं.
या पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्र पुरवण्याचे काम त्याकाळात हौसाबाईंनी केलं होतं. त्या वेळेच्या रोमांचक आठवणी त्या आजही तितक्याच कणखरपणाने सांगतात.
व्हीडिओ शूट - प्रविण राठोड
एडिटींग - गणेश पोळ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)