पाहा व्हीडिओ : 'आमचं दु:ख जगात कुणीच समजू शकत नाही'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'आमचं दु:ख जगात कुणीच समजू शकत नाही'

आसाम सरकरानं 30 जुलैला NRCची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात आसाममधल्या 40 लाख लोकांची नावं नाहीत.

यातल्याच एक आहेत जुतिका दास.

30 जुलैपासून जुतिका यांचे अश्रू थांबत नाहीयेत. आमचं दु:ख जगात कुणालाच समजू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

जुतिका यांचं NRCच्या यादीत नाव आहे. पण त्यांची 4 वर्षांची विकलांग मुलगी आणि 2 वर्षांच्या मुलाचं नाव मात्र यादीत नाही. तसंच

पती अजित दास अडीच महिन्यांपासून डिटेंशन कॅम्पमध्ये आहेत. त्यांचंही नाव या यादीत नाही.

आता माझ्या मुलांनाही माझ्यापासून हिरावून घेणार का, असा सवाल जुतिका करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)