युक्रेन-रशिया युद्ध : रशियाकडून आण्विकयुद्धाचा वार्षिक सराव, पुतिन यांनी घेतला आढावा

फोटो स्रोत, GAVRIIL GRIGOROV/KREMLIN POOL/SPUTNIK/POOL/EPA-EFE
युक्रेनवर हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर फोर्सच्या वार्षिक आण्विक सरावाचा आढावा घेतला.
क्रेमलिनने सांगितलं की, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रं पूर्वेकडील भागात आणि आर्क्टिक भागात लाँच करण्यात आली.
न्यू स्टार्ट शस्त्रास्त्र करारानुसार अमेरिकेला या सरावाबद्दल माहिती देण्यात आली होती. ही क्षेपणास्त्रं अशावेळी सोडण्यात आली आहेत, ज्यावेळी रशियाने युक्रेनवर 'डर्टी बॉम्ब'च्या वापराचा आरोप केला आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
रशियाने काय दावा केलाय?
रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू यांनी युकेचे संरक्षण मंत्री बेन वॉलॅस यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की, "आम्हाला काळजी वाटतेय. युक्रेनकडून 'डर्टी बॉम्ब'चा वापर केला जाऊ शकतो."
त्यांनी अमेरिका, फ्रान्स आणि टर्कीच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करताना अशाच प्रकारची वक्तव्य केली आहेत.
रशियाच्या आरोपांबाबत अमेरिका, फ्रान्स आणि यूके सरकारने संयुक्त पत्र जारी केलंय. "युक्रेन त्यांच्याच शहरांवर 'डर्टी बॉम्ब'चा वापर करेल. हे रशियाचे खोटे आरोप आम्ही फेटाळतो आहे."
दुसरीकडे, युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांनीदेखील रशियाचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी रशियावर "या युद्धात सर्व वाईट गोष्टी" केल्याचा आरोप केला आहे.



किरणोत्सर्गी पदार्थांमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर केल्यास लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होण्याची शक्यता असते.
याचा वापर केल्यास मोठ्या परिसराला धोका पोहोचण्याची शक्यता असते. किरणोत्सर्गावर नियंत्रण आणि लोकांच्या जीवाला धोको पोहोचू नये यासाठी नागरिकांचं स्थलांतर करावं लागतं किंवा किरणोत्सर्ग झालेला परिसर कायमचा निर्मनुष्य करावा लागतो.
अमेरिकन संशोधकांच्या फेडरेशनच्या अंदाजानुसार, या बॉम्बमध्ये 9 ग्रॅम कोबाल्ट-60 आणि 5 किलो TNT स्फोटकांचा वापर करण्यात आला असेल आणि बॉम्ब न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनवर टाकला तर, पुढच्या काही दशकांसाठी हा परिसर रहाण्यासाठी योग्य रहाणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
याच कारणासाठी 'डर्टी बॉम्ब' ला वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन किंवा सामूहिक हत्यांचं एक शस्त्र म्हणून मानलं जातं.
पण, 'डर्टी बॉम्ब' एक हुकमी हत्यार अजिबात नाहीय.
'डर्टी बॉम्ब'मधील किरणोत्सर्गी पदार्थ हवेत मिसळण्यासाठी याला पावडर स्वरूपात असणं आवश्यक आहे. पण, याचे कण खूप छोटे असतील किंवा वारा फार जास्त असेल तर दूरवर वाहत जाऊ शकतात. ज्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








